MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Pune Graduates Constituency Election: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला असताना देखील आणखी एक नेता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आला आहे.
MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ
Pune MLC ElectionSaam Tv
Published On: 
  • पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

  • पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली

  • शरद लाड यांच्याऐवजी स्मिता जाधव यांना भाजकडून उमेदवारी

  • पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीनंतर राजकीय हालचाली

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. या निडणुकीसाठी भाजपने अधिकृत उमेदवार दिलेला असताना देखील भाजपकडून इच्छूक असणाऱ्या दुसऱ्या नेत्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. भाजपने रविवारी विधान परिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शरद लाड यांच्याऐवजी स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी स्मिता जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिली. शरद लाड यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू होती. पण अचानक भाजपने शरद लाड यांच्या ऐवजी स्मिता जाधव यांना संधी दिली. त्यामुळे शरद लाड नाराज झाले. अशातच आता अधिकृत उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतरही शरद लाड उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत.

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra MLC Election: पाच जागा, दावेदार अनेक! महायुतीत जागावाटपावरून चढाओढ; राजकीय मोर्चेबांधणीला वेग

'पक्षानेच मला अर्ज दाखल करण्यास सांगितले', शरद लाड यांनी असा दावा केला. लाड यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लाड यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सविस्तर चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. स्मिता जाधव अधिकृत उमेदवार असताना लाडांचा अर्ज नेमका कोणत्या भूमिकेतून? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट आला असला तरी देखील अर्ज छाननीनंतर भाजपच्या या घडामोडीचे राजकीय गणित स्पष्ट होणार आहे.

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ
Election: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक- पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले, मतदान अन् निकाल कधी?

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव (पदवीधर मतदारसंघ) आणि कौस्तुभ मुरलीधर गावडे (शिक्षक मतदारसंघ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दोघांनीही विजयाचा विश्वास व्यक्त करत आपापल्या प्राथमिक बाबी, मतदारसंघातील समस्या आणि राजकीय समीकरणांवर भाष्य केले. दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हर्षदा जाधव यांना अजून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. महाविकास आघाडी कडून हर्षदा जाधव उमेदवार असण्याची शक्यता आहे.

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ
MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com