MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

Thackeray Sena Announces Candidate List: शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?
MLC Election 2026Saam Tv
Published On: 
  • विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरेसेनेकडून उमेदवार जाहीर

  • ठाकरेसेनेने विधानपरिषदेसाठी २ उमेदवारांना दिली संधी

  • अमरावती शिक्षक मतदारसंघातून दत्तात्रय लहाने

  • संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून दिलीप घुगे

महाराष्ट्रात लवकरच विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहे. महाराष्ट्रातील ५ जागांवर ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. रविवारी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ आता शिवसेना ठाकरे गटाने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरेसेनेने आपले २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी २ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमधून दोघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी दत्तात्रय लहानेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर पदवीधरसाठी दिलीप घुगेंना संधी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसनंही अमरावतीच्या जागेसाठी उमेदवार घोषित केल्यानं मविआत बिघाडी पाहायला मिळत आहे. अमरावतीमध्ये आधीपासूनच ठाकरेसेने आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. आता दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवले आहेत.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?
Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा?

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अदिती ऋषिकेश पोहरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिलीप कडू यांच्या नामांकन अर्ज दाखल करताना आमदार संजय खोडके, सुलभा खोडके हे देखील उपस्थित होते.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?
Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी ३ उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपने पुण्यातील पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकार विठ्ठलराव कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात इतर राजकीय पक्षांकडून देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुक मुरलीधर गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरून महायुतीत दिर्घकाळ चर्चा सुरू होती. हा मतदारसंघासाठी शिवसेना शिंदेगट देखील आग्रही होता. पण आता ही जागा भाजपच्या पदरात पडली.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?
MLC Election: विधानपरिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच; मविआतही नाराजी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com