Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा?

Gokul Dudh Sangh Nivadnuk: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या निवणुकीसाठी जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. अशात महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.
Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा?
Gokul Election 2026Saam Tv
Published On: 
  • गोकुळ निवडणुकीत महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

  • गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ९ जागा

  • गोकुळ निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला ७ जागा

  • गोकुळ जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेणार

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ९, तर भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी ७ जागा देण्याच्या सूत्रावर चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. बुधवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्णयाकडे महायुतीच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे.

जागावाटपाच्या बैठकीनंतर महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठकही झाली. प्रत्येक पक्षाकडून जागांची मागणी करण्यात आली असली, तरी ९-७-७ या सूत्रावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गटाला एक जागा देण्याचा निर्णय झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यांच्या गटाला जागा दिल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याची एक जागा कमी होणार असल्याची चर्चा आहे.

Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा?
Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड घडणार?, दिल्ली दौऱ्याआधी मुख्यमंत्र्यांची बड्या नेत्यासोबत बंद दाराआड चर्चा

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरूच असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतला जाणार आहे. गोकुळच्या निवडणुकीत महायुतीची ही जागावाटपाची गणितं अंतिम स्वरूपात कशी येतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा?
Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com