महायुती सरकारला मोठा धक्का! सहकार मंत्र्यांवर आरबीआयची थेट कारवाई; संचालकपदावरून उचलबांगडी

Babasaheb Patil news : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी संबंधित लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालकपदाच्या प्रकरणात RBIच्या १० वर्षांच्या कार्यकाळाच्या नियमाची चर्चा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
RBI Action on Babasaheb Patil Over Latur Bank Director Post
RBI Action on Babasaheb Patil Over Latur Bank Director Post
Published On

RBI action, Babasaheb Patil : फडणवीस सरकारमधील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) धडक कारवाई केली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून बाबासाहेब पाटील यांना थेट बडतर्फी करण्यात आले आहे. सहकार क्षेत्राचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्यावरच आरबीआयने ही कारवाई केल्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय आहे कारवाईमागील कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील हे गेल्या तब्बल १० वर्षांपासून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, सहकारी बँकांमध्ये कोणत्याही व्यक्तीला एका विशिष्ट मर्यादेपेक्षा (१० वर्षांपेक्षा) जास्त काळ संचालक पदावर राहता येत नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरबीआयने ही कठोर पावले उचलत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.

RBI action against Babasaheb Patil
RBI action against Babasaheb PatilSaam
RBI Action on Babasaheb Patil Over Latur Bank Director Post
फक्त १५० रुपयांत बीडहून पुण्यात टच, पाहा कुठल्या स्थानकांवर थांबणार ट्रेन? जाणून घ्या बुकींगची वेळ

महायुती सरकारला मोठा धक्का

राज्याचे सहकार खाते सांभाळणाऱ्या मंत्र्यावरच रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उगारल्याने महायुती सरकारसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. ज्या मंत्र्यांच्या हातात राज्यातील सर्व सहकारी संस्थांचा कारभार आहे, त्यांनीच आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आल्याने विरोधकांकडूनही आता यावर जोरदार टीका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RBI Action on Babasaheb Patil Over Latur Bank Director Post
तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

दरम्यान, या कारवाईनंतर लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पुढील राजकीय घडामोडींकडे आणि बाबासाहेब पाटील यावर काय कायदेशीर मार्ग अवलंबतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com