फक्त १५० रुपयांत बीडहून पुण्यात टच, पाहा कुठल्या स्थानकांवर थांबणार ट्रेन? जाणून घ्या बुकींगची वेळ

Pune Beed Express train : पुणे-बीड-पुणे दैनंदिन एक्स्प्रेस २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. २० सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होईल. ट्रेनचे वेळापत्रक, थांबे, तिकीट दर आणि बुकिंगची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Pune-Beed Express Train
Pune-Beed Express Trainसाम टीव्ही
Published On

Pune Beed Express train Ticket update : पुणे आणि बीड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेद्वारे पुणे - बीड - पुणे (11433 / 11434) ही दैनंदिन एक्सप्रेस गाडी नियमित सेवेसाठी सुरू करण्यात येत आहे. या गाडीमुळे दोन्ही शहरांमधील संपर्क वाढणार असून प्रवाशांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहे.

गाडीचे वेळापत्रक आणि तारीख:

पुणे ते बीड (गाडी क्र. 11433) ही गाडी २२ सप्टेंबर २०२६ पासून पुण्यावरून दररोज रात्री १०:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:०० वाजता बीडला पोहोचेल.

बीड ते पुणे (गाडी क्र. 11434) ही गाडी २३ सप्टेंबर २०२६ पासून बीडवरून दररोज रात्री ०९:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:२० वाजता पुण्याला पोहोचेल.

Pune-Beed Express Train
Gold price today : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! आज सोन्याच्या दरात वाढ; पाहा 24K, 22K आणि 18K चे ताजे भाव

कोण कोणत्या स्थानकावर थांबणार एक्स्प्रेस -

बीडहून पुण्याला एक्सप्रेस ट्रेनने फक्त ७ ते ८ तासात पोहचता येणार आहे. रात्री साडेनऊ वाजता सुटलेली ट्रेन पहाटे ५ वाजता पोहोचणार आहे. पुणे-बीड ही एक्सप्रेस गाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोह, न्यू आष्टी आणि अमळनेर भांड्याचे या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.

Pune-Beed Express Train
Pune : पुण्यात दूध थेट १० रुपयांनी महागलं! भाव वाढण्यामागचं 'हे' आहे सर्वात मोठं कारण

तिकीट बुकिंग कधीपासून होणार सुरूवात?

पुणे-बीड या ट्रेनचे तिकीट आरक्षण २० सप्टेंबर २०२६ पासून सर्व PRS केंद्रांवर तसेच IRCTC च्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) सुरू होणार आहे. याशिवाय अनारक्षित (General) डब्यांसाठी प्रवासी UTS प्रणालीद्वारे किंवा 'रेल वन' (RailOne) ॲपद्वारे तिकीट बुक करू शकतात.

तिकीट दर (Class wise Ticket Prices):

स्लीपर (SL): ₹१५० ते ₹२६५

३ एसी (3A / 3E): ₹५२० ते ₹७२०

२ एसी (2A): ₹७२५ ते ₹१,०२०

फर्स्ट एसी (1A): ₹१,१९० ते ₹१,७०५

Pune-Beed Express Train
तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

बीड ते पुणे दरम्यान अखेर बहुप्रतिक्षित थेट रेल्वे सेवा सुरू होत आहे. या मार्गामुळे बीडमधील लाखो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत खासगी बस आणि ट्रॅव्हल्सच्या महागड्या तिकीट दरांमुळे होणारी आर्थिक लूट यामुळे थांबणार आहे. फक्त १५० रुपयांत पुणे गाठणे शक्य होणार आहे. या नवीन दैनंदिन एक्सप्रेसचा सर्वाधिक फायदा नोकरदारवर्ग, पुण्या-मुंबईत शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि आरोग्य उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांना होणार आहे. या एक्सप्रेसमुळे बीड जिल्ह्याच्या दळणवळणाला आणि आर्थिक विकासाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com