Amravati Teachers Constituency: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आमने-सामने; दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाढली रंगत

Amravati MLC Election 2026: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत दत्तात्रय लहाने यांना शिवसेना ठाकरे गटाने, तर अदिती ऋषिकेश पोहरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये निवडणूक लढत होण्याची शक्यता असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Amravati Teachers Constituency
Amravati Teachers Constituencysaam tv
Published On: 

अमरावती शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी आता राजकीय चित्र स्पष्ट होताना दिसतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसने अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

दत्तात्रय लहाने हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करत आहेत. शिक्षकांच्या विविध समस्या त्यांनी आंदोलने आणि निवेदनांच्या माध्यमातून शासनासमोर मांडल्या आहेत.

Amravati Teachers Constituency
Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द

मुंबईत दत्तात्रय लहाने यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्याबाबत लहाने यांना शब्द दिला होता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लहाने यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

Amravati Teachers Constituency
Gorai Beach accident: गोराई बीचवर हिट अँड रनचा थरार; भरधाव गाडीची आधी रिक्षाला धडक, नंतर महिलांना उडवलं

लहाने यांनी गेल्या सहा महिन्यांपासून मतदारसंघात संपर्क सुरू असल्याचं सांगितलं. या काळात त्यांनी अनेक शाळांना भेटी दिल्या असून शिक्षकांशी संवाद साधला आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

लहाने हे केवळ शिक्षकांच्या प्रश्नांसाठीच नव्हे, तर गेल्या चार-पाच वर्षांपासून विधवा, घटस्फोटित आणि इतर एकल महिलांसाठीही काम करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Amravati Teachers Constituency
Earthquake : सकाळीच हिंगोलीत प्रचंड खळबळ! भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली; रिश्टर स्केलवरील नोंद पाहून सगळेच हादरले

उमेदवारी मिळाल्यानंतर लहाने यांनी शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान ५ ऑक्टोबर रोजी अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत दत्तात्रय लहाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com