

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी.
महायुतीमध्ये जागावाटप आणि उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा.
मविआतील घटक पक्षांसमोरही जागावाटपाचा पेच.
विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी राज्यात निवडणुका होत आहेत. मात्र यावरून महायुतीतील रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 15 संभाव्य नावांची यादी राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवलीय. तर अमरावतीची जागा शिंदेसेनाला आणि छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला वाट्याला जाण्याची शक्यता आहे...मात्र भाजपनं तीन जागांवर दावा ठोकल्यामुळे शिंदेसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीत नाराजी पसरलीय कोणत्या मतदारसंघातून महायुतीत किती जण इच्छुक आहेत. पाहूयात.
पुणे पदवीधर
शरद लाड,इच्छुक , भाजप,
भय्या माने, इच्छुक, राष्ट्रवादी(AP)
पुणे शिक्षक-
मंगेश चिवटे, इच्छुक, शिंदेसेना
सचिन सानप, इच्छुक, शिंदेसेना
कौस्तुभ गावडे, इच्छुक, भाजप
नागपूर पदवीधर
सुधाकर कोहळे, इच्छुक, भाजप
अनिल सोले, इच्छुक, भाजप
रमण सेनाड, इच्छुक, भाजप
अमरावती शिक्षक
किरण सरनाईक, आमदार, शिंदेसेना
श्रीकांत देशपांडे, इच्छुक,शिंदेसेना
संगीता शिंदे, इच्छुक, भाजप
शेखर भोयर, इच्छुक, भाजप
सुमीत पवार, इच्छुक, भाजप
छ. संभाजीनगर पदवीधर
सतीश चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी(AP)
डॉ. प्रमोद राठोड, इच्छुक,भाजप
प्रवीण घुगे, इच्छुक, भाजप
एकीकडे महायुतीत इच्छुकांची मोठी रांग असताना दुसरीकडे पुण्याच्या जागेकडे सर्वाचंच लक्ष लागलयं... पुणे शिक्षक मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे OSD मंगेश चिवटे तर मंत्री उदय सामंतांचे OSD सचिन सानप दोघेही इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यास सानप आणि चिवटे दोन्हीही अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुती बंडखोरी अटळ मानली जातेय.
दुसरीकडे मविआतही सारं काही आलबेल नाही. कारण काँग्रेसनं विद्यमान आमदार असलेल्या दोन जागांसह आणखी एका जागेवर मविआतील घटकपक्षांसोबत कुठलीच चर्चा न करता तीन उमेदवार जाहीर केले आहेत.
काँग्रेसचे विधान परिषद उमेदवार जाहीर
नागपूर पदवीधर
अभिजीत वंजारी
पुणे शिक्षक
जयंत आसगावकर
अमरावती शिक्षक
प्रा. अदिती पोहारे
दरम्यान काँग्रेसनं चर्चेविना उमेदवार जाहीर केल्यामुळे ठाकरेसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी पसरलीय. त्यामुळे मविआतील नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढाईचे संकेत दिलेत. मुळात विधानपरिषदेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 6 ऑक्टोबर ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात जागा वाटप आणि उमेदवारांबाबत काय हालचाली होता त्यावर सगळी समीकरणं अवलंबून आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.