Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

Bypoll Election 2026: ५ विधानसभा आणि एका लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहे. आज निवडणूक आयोगाने यासाठी निवडणूक कार्यक्रम जारी केला. मतदान आणि निकाल कधी हे जाणून घ्या...
Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या
Bypoll Election 2026Saam Tv
Published On
  • ५ विधानसभा आणि एका लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे

  • निवडणूक आयोगाकडून आज निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात आला

  • या ६ जागांसाठी ६ ऑक्टोबरला मतदान होणार आहे

  • पोटनिवडणुकीचा निकाल ९ ऑक्टोबरला जाहीर होणार

देशातील ४ राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशातील रिक्त झालेल्या ५ विधानसभा आणि एका लोकसभेच्या जागेसाठी आज पोटनिवडणुकीचा धुराळा उडाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ५ विधानसभा आणि एक राज्यसभेच्या जागांसाठी पुढच्या महिन्यात ६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊ निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जारी केल्यानंतर आदर्श आचारसंगिता लागू झाली आहे. निवडणूका जाहीर होताच या सहाही ठिकाणचे राजकीय पक्ष प्रचाराच्या कामाला लागले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले की, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पद्दुचेरीतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये नंदिग्राम विधानसभा मतदारसंघ आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघ, तर तामिळनाडूच्या मदुरंतकम विधानसभा मतदारसंघ आणि धारापुरम विधानसभा मतदारसंघ येथे पोटनिवडणुका होणार आहेत. पुदुचेरीमध्ये थट्टानचावडी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यासोबत नागावलोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुक होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी या सहाही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडेल. या पोटनिवडणुकीसाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या
Election: पुणे शिक्षक मतदारसंघातून पहिला उमेदवार ठरला, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, तामिळनाडूतील मदुरंतकम आणि धरपुरम विधानसभा जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. पुदुचेरीमधील थट्टानचावडी विधानसभा जागा आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम विधानसभा जागांचाही पोटनिवडणुका होणार आहे. आसाममधील नागाव लोकसभा जागेवरही ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मतदार ६ ऑक्टोबर रोजी एकूण सहा विधानसभा जागा आणि एका लोकसभा जागेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार, मोदी-ममतांची प्रतिष्ठा पणाला

या सहाही जागांवर संबंधित लोकप्रतिनिधींचे निधन झाल्यामुळे किंवा त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांवर आता पुन्हा निवडणूक घेण्यात येत आहेत. या पोटनिवडणुकीसाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. लोकसभेची जागा असल्याने येथील निवडणुकीकडे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांचे बारकाईने लक्ष लागलेले आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम -

राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख - ९ सप्टेंबर, २०२६

नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख - १६ सप्टेंबर, २०२६

नामनिर्देशन पत्रांची छाननी - १७ सप्टेंबर, २०२६

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - १९ सप्टेंबर, २०२६

मतदानाची तारीख - ६ ऑक्टोबर, २०२६

मतमोजणीची तारीख - ९ ऑक्टोबर, २०२६

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख - ११ ऑक्टोबर, २०२६

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या
Election 2027 : सर्वात मोठी बातमी! यूपीसह ५ राज्यांतील निवडणुकांची तारीख आली समोर; 'या' महिन्यात होणार मतदान?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com