

पुणे शिक्षक मतदारसंघातून टीडीएफचा पहिला उमेदवार ठरला
कौस्तुभ गावडे यांना पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी
सचिन सानप यांचा पत्ता कट करण्यात आला
उदय सामंत यांच्या OSD सचिन सानप यांच्या नावाची आधी होती चर्चा
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर टीडीएफने आपला उमेदवार जाहीर केला. संस्थाचालक कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे टीडीएफकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले सचिन सानप यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षक नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी जाहीर केल्यामुळे टीडीएफ शिक्षक संघटनेत फूट पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शिक्षक मतदारसंघासाठी सचिन सानप यांच्या नावाची चर्चा होती. सचिन सानप हे राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे ओडीएस आहेत. सानप यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी टीडीएफकडे मुलाखत दिली होती हा चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, टीडीएफने अखेर कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्यामुळे सानप यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
टीडीएफच्या वतीने काही दिवसांपूर्वी पुणे विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील इच्छुक सहभागी झाले होते. या मुलाखतीनंतर निवड समितीने कौस्तुभ गावडे यांच्या नावाची अखेर घोषणा केली. संघटनेशी असलेली बांधिलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि प्रभावी प्रतिनिधित्वाची क्षमता या निकषांच्या आधारे गावडे यांची निवड करण्यात आल्याचे टीडीएफने सांगितले.
‘मूळ शिक्षकच हवा’ म्हणणाऱ्या टीडीएफने सचिन सानप यांना नाकारले. महत्वाचे म्हणजे इच्छुकांच्या मुलाखतीपूर्वीच टीडीएफने ‘उमेदवार हा मूळ शिक्षकच असला पाहिजे’ अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांचे OSD असलेल्या सचिन सानप यांच्या मुलाखतीनंतर त्यांच्या उमेदवारीची मोठी चर्चा झाली होती. सचिन सानप हे शिक्षक असताना तसंच टीडीएफच्या या निकषात बसत असतानाही त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
त्यांच्याऐवजी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या कौस्तुभ गावडे यांना पसंती दिली. टीडीएफचे माजी अध्यक्ष कानडे सर यांनी कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी ही टीडीएफची अधिकृत उमेदवारी नसल्याचे सांगितले आहे. कौस्तुभ गावडे आणि तथाकथित टीडीएफ संघटनेचे अध्यक्ष जी के थोरात यांच्यामध्ये दहा वेळा गुप्त पद्धतीने बैठका झाल्या आहेत.
टीडीएफ संघटनेतील जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी या सर्वांचा शिक्षकाला उमेदवारी देण्याबद्दल आग्रह असताना देखील थोराआणि मंडळींनी इतरांवर दबाव टाकून हा निर्णय घेतल्याची बोलले जात आहे. शिक्षक संघटनेचा तरी उमेदवार शिक्षक असावा याला हरताळ फासल्याचे दिसून येते.
पीडीएफ अर्थातच टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजे शिक्षकांची लोकशाही आघाडी ही प्रामुख्याने पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवून पुढे चालणाऱ्या चळवळीतील शिक्षकांचे संघटन आहे असे असताना तीव्र उजवी विचारसरणी धारण करणाऱ्या भाजप प्रणित उमेदवाराला टीडीएफने उमेदवारी दिल्यामुळे संघटनेची मूल्य गुंडाळल्याचे बोलले जात आहेत. या उमेदवारी दरम्यान जी के थोरात आणि मंडळींवर प्रचंड मोठ्या आर्थिक व्यवहाराचे आरोप होत आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.