Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा फेरबदल, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी

Shivsena Uddhav Thackeray Group: शिवसेना ठाकरे गटात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. सचिन अहिर यांनी शिवसेना सोडल्यानंतर एका बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा फेरबदल, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी
Maharashtra PoliticsSaam Tv News
Published On
  • ठाकरे गटाने सचिन पडवळ यांच्यावर सोपवली मोठी जबाबदरी

  • पुण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली

  • शिवसेना ठाकरे गट पुणे शहर जिल्हा संपर्कप्रमुखपदी पडवळ यांची निवड

  • पुण्यात ठाकरे गटाचा मोठा संघटनात्मक फेरबदल

सचिन जाधव, पुणे

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे शहर आणि जिल्हा संपर्कप्रमुखपदी सचिन पडवळ यांची निवड करण्यात आली. सचिन पडवळ हे आता पुण्याचे संपर्कप्रमुख असणार आहेत.

नगरसेवक सचिन पडवळ यांची पुणे शहर आणि जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी पुण्याचे संपर्कप्रमुख सचिन आहेर यांनी अचानकपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर पुणे शहराचे संपर्कप्रमुख पद खाली होते. एक सचिन सोडून गेल्यानंतर ठाकरेसेनेने दुसऱ्या सचिन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा फेरबदल, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी
Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; निष्ठावंत नेत्याचा राजीनामा,४ माजी नगरसेवकांसह शिवसेनेत करणार प्रवेश

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्यात आले आहे. सचिन पडवळ शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत. सचिन पडवळ शिवडीचे नगरसेवक आहेत. निष्ठांवत शिवसैनिक म्हणून सचिन पडवळ यांच्याकडे पाहिलं जातं. मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी सुधार समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा फेरबदल, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी
Maharashtra Politics: काँग्रेसला हादरा! शिंदेसेनेच्या गळाला लागला मोठा मासा; शेकडो पदाधिकाऱ्यांसह 'धनुष्यबाण' घेणार हाती

सचिन पडवळ प्रामुख्याने नागरी समस्या, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था आणि स्थानिक सुधारणांसाठी आवाज उठवण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे आता पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण संपूर्ण परिसरात संपर्क प्रमुख म्हणून काम करणार आहेत. गेले काही काळापासून पुणे शहर जिल्ह्यात शिवसेनेला म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही. आता सचिन पडवळ यांच्या रूपाने अजून एक संपर्कप्रमुख मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवण्याचे आणि विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडून आणण्याचे मोठं काम त्यांच्याकडे असणार आहे.

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा फेरबदल, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी
Maharashtra Politics: सुप्रिया सुळे यांचं नाव अनावधानाने घेतलं, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला खेद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com