

संभाजीनगरमध्ये मोठी राजकीय घडामोड
२३ नगरसेवकांना अपात्रतेची टांगती तलवार
भाजप आणि एमआयएम नगरसेवकांवर होणार कारवाई
बेकायदा बांधकामामुळे नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. संभाजीनगर मनपाच्या २३ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यामध्ये भाजपच्या ७ आणि एमआयएमच्या १६ नगरसेवकांचा समावेश आहे. पराभूत उमेदवारांच्या तक्रारीनंतर मनपा प्रशासन कारवाई करण्याच्या तयारीत आहे. या सर्व नगरसेवकांना प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या २३ नगरसेवकांना अपात्रतेबाबत नोटिसा बजावण्यात आल्यामुळे जोरदार चर्चा होऊ लागली आहे. सत्ताधारी भाजपचे ७ आणि एमआयएमचे १६ नगरसेवकांचे पद अडचणीत आले आहे. बेकायदा बांधकाम, अतिक्रमण आणि इतर कारणांवरून या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नगरसेवकांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली असून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये याबाबत सुनावणी होणार आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास एकतर्फी निर्णय होऊ शकतो.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार, बेकायदा बांधकाम, सरकारी जागेवरील अतिक्रमण किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य अशा कारणांवरून नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. या तक्रारींची विविध विभागांकडून पडताळणी करण्यात आली असून त्यानंतर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नगरसेवकांना नोटीसा बजावण्यात आल्यामुळे त्यांचे पद धोक्यात आले आहेत. त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नोटीस मिळालेल्या नगरसेवकांना बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुनावणी होणार असून संबंधित नगरसेवकांनी आवश्यक कागदपत्रांसह म्हणणे सादर करायचे आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास प्रशासनाकडून एकतर्फी निर्णय घेतला जाऊ शकतो. या प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सुनावणीनंतर मनपा प्रशासनाचा अंतिम निर्णय काय होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.