

कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. आज पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर त्याचप्रमाणे विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि झारखंड परिसरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून ते सध्या सक्रिय आहे. या भागाला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालीये. या वाऱ्यांच्या प्रभावातून छत्तीसगड, झारखंड आणि उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टाही सध्या एक्टिव्ह आहे. हा पट्टा पंजाबमधील अमृतसरपासून नजीबाबाद, शाहजहानपूर आणि वाराणसीमार्गे कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रापर्यंत पोहोचला असून त्याठिकाणाहून पुढे उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलाय. पूर्व मध्य प्रदेशातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालीये.
सोमवारी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ३४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. त्याचवेळी महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतलीये. मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतायत. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमध्ये सर्वाधिक ८७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झालीये.
आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर त्याचप्रमाणे विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड तसेच विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय.
उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीये.
पुणे: कमाल २८.५ अंश, किमान २२.५ अंश
अहिल्यानगर: कमाल ३१.२ अंश, किमान २३.१ अंश
धुळे: कमाल ३२ अंश, किमान १९.४ अंश
जळगाव: कमाल ३१.७ अंश, किमान २३.६ अंश
जेऊर: कमाल ३३.५ अंश, किमान २१.५ अंश
कोल्हापूर: कमाल २५.६ अंश, किमान २२.१ अंश
महाबळेश्वर: कमाल १९.४ अंश, किमान १७.७ अंश
मालेगाव: कमाल ३१.४ अंश, किमान २२.४ अंश
नाशिक: कमाल २९.१ अंश, किमान २१.८ अंश
निफाड: कमाल ३०.५ अंश, किमान ३१.३ अंश
सांगली: कमाल २६.९ अंश, किमान २१.८ अंश
सातारा: कमाल २७.२ अंश, किमान २२.१ अंश
सोलापूर: कमाल ३४.३ अंश, किमान तापमानाची नोंद नाही
सांताक्रूझ: कमाल ३१.५ अंश, किमान २५ अंश
डहाणू: कमाल ३१.९ अंश, किमान २५.१ अंश
रत्नागिरी: कमाल ३०.५ अंश, किमान २४.६ अंश
छत्रपती संभाजीनगर: कमाल २९.८ अंश, किमान २२ अंश
धाराशिव: कमाल ३०.७ अंश, किमान २० अंश
परभणी: कमाल ३३ अंश, किमान २३ अंश
परभणी कृषी: कमाल ३१.२ अंश, किमान २२.४ अंश
अकोला: कमाल ३३.३ अंश, किमान २५.८ अंश
अमरावती: कमाल २८.४ अंश, किमान २४ अंश
ब्रह्मपुरी: कमाल २६.८ अंश, किमान २४.५ अंश
बुलडाणा: कमाल ३२.६ अंश, किमान २३ अंश
चंद्रपूर: कमाल २७.२ अंश, किमान २४.६ अंश
गडचिरोली: कमाल २६.२ अंश, किमान २४.२ अंश
गोंदिया: कमाल २९.४ अंश, किमान २२.४ अंश
नागपूर: कमाल २९.७ अंश, किमान २३ अंश
वर्धा: कमाल २८.५ अंश, किमान २५.२ अंश
वाशीम: कमाल २९.४ अंश, किमान २१.४ अंश
यवतमाळ: कमाल २८.४ अंश, किमान १९.६ अंश
उत्तर महाराष्ट्र: किमान १९.४ अंश, कमाल ३२ अंश
पश्चिम महाराष्ट्र: किमान १७.७ अंश, कमाल ३४.३ अंश
कोकण: किमान २४.६ अंश, कमाल ३१.९ अंश
मराठवाडा: किमान २० अंश, कमाल ३३ अंश
विदर्भ: किमान १९.६ अंश, कमाल ३३.३ अंश
जोरदार पावसाचा येलो अलर्ट- पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, गोंदिया आणि गडचिरोली.
विजांसह पावसाचा येलो अलर्ट- छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर.
विजांसह पावसाची शक्यता- नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, बीड आणि हिंगोली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.