

अजित पवार गटातील माजी महापौर प्रताप देशमुख यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
राजीनाम्यानंतर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार
देशमुख यांच्यासोबत चार माजी नगरसेवकही शिंदे गटात जाणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विदर्भात राजकीय डाव टाकत राष्ट्र्वादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. अजित पवार गटातील निष्ठावंत नेत्याला फोडत परभणीमधील राजकारणात भूकंप घडवून आणलाय. माजी महापौर प्रताप देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश करताना राजीनामा देण्याचं कारणही सांगितलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकीय प्रवासाला दिवंगत नेते अजित पवारांमुळे सुरूवात केली होती. आता माझे ते पालकच हरवल्याने या प्रवासाला पूर्णविराम देतोय. माझी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा या पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर कोणतीच नाराजी नाहीये, असे देशमुख यांनी राजीनामा देताना सांगितलंय. राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत नव्या राजकीय पर्वाला सुरूवात केल्याचं माजी महापौर प्रताप देशमुख यांनी सांगितलंय.
प्रताप देशमुख हे शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 30 रोजी धनुष्यबाण हाती घेणार आहेत. हे पक्षांतर आपण आपला राजकीय पालक हरवल्यामुळे करत आहोत, आपली कोणाबद्दलही तक्रार किंवा नाराजी नसल्याचं देशमुख म्हणालेत. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी व चार माजी नगरसेवकही त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे परभणी शहरातील राजकारणात मोठा उलटफेर होणार आहे.
परभणीत शिवसेनेच्या वतीने 30 ऑगस्टला शेतकरी व युवकांसाठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी खासदार संजय जाधव व माजी महापौर प्रताप देशमुख यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, माझे आतापर्यंतचे संपूर्ण राजकीय जीवन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.
पक्षावर कोणतीही नाराजी नाही. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर आमचा पालकच हरवला. अजितदादा हेच आमच्यासाठी पक्ष होते, असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहोत, असेही देशमुख यांनी सांगितले. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असून, चार माजी नगरसेवकांचाही या प्रवेश सोहळ्यात समावेश असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.