MLC Election: पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीआधी मोठी घडामोड, ७ उमेदवारांचे अर्ज बाद, आता रिंगणात किती?

Pune Election: पुणे पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या ७ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
MLC Election: पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीआधी मोठी घडामोड, ७ उमेदवारांचे अर्ज बाद, आता रिंगणात किती?
Pune MLC Election 2026Saam Tv
Published On: 
  • महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू

  • पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ४८ आणि पदवीधर मतदारसंघासाठी ६९ उमेदवारांनी अर्ज दाखल

  • ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी करण्यात आली

  • पदवीधर मतदारसंघातील ६ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले

अक्षय बडवे, पुणे

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या ५ जागांसाठी २७ ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि मविआमध्ये बंडखोरी झाली आहे. सर्वांचे लक्ष पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकडे लागले आहे. पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी ४८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी ६९ उमेदवार रिंगणात उतरले असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज अर्जांची छाननी झाली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या ६ उमेदवारांचे अर्ज अवैद ठरवत बाद करण्यात आले. तर शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल केलेल्या एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला. येत्या ९ तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. यावेळी किती उमेदवार अर्ज माघारी घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवाराचे नाव जाहीर केलेले असताना देखील इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.

MLC Election: पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीआधी मोठी घडामोड, ७ उमेदवारांचे अर्ज बाद, आता रिंगणात किती?
MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

नामनिर्देशपत्रे अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे:

पदवीधर मतदारसंघ -

१) हरिदास चंदर भिसे, अपक्ष

२) उमेश महादेव म्हेत्रे-महाराष्ट्र लोक काँग्रेस

३) तुकाराम सबाजी कांबळे, अपक्ष

४) गुणाजी संभाजी मोरे, अपक्ष

५) धनंजय आकाराम रुपनर, अपक्ष

६) ज्ञानेश्वर भगवंत कराडे, अपक्ष

शिक्षक मतदार संघ -

१) अरुण उमेश सावंत, अपक्ष

MLC Election: पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीआधी मोठी घडामोड, ७ उमेदवारांचे अर्ज बाद, आता रिंगणात किती?
MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. ७ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी झाली. ९ ऑक्टोबर हा अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.

MLC Election: पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीआधी मोठी घडामोड, ७ उमेदवारांचे अर्ज बाद, आता रिंगणात किती?
Maharashtra MLC Election: पाच जागा, दावेदार अनेक! महायुतीत जागावाटपावरून चढाओढ; राजकीय मोर्चेबांधणीला वेग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com