महायुती की महाविकास आघाडी, विधान परिषद निवडणुकीत कोण मारणार बाजी? पाहा 'साम' एक्झिट पोलचा अंदाज

Maharashtra Legislative Council Election 2026 Exit Poll Results: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीला स्पष्ट आघाडी मिळण्याचा अंदाज 'साम' एक्झिट पोलमधून समोर आला आहे.
Visual representation of Maharashtra MLC election trends showing Mahayuti leading over Mahavikas Aghadi as per exit poll estimates.
Visual representation of Maharashtra MLC election trends showing Mahayuti leading over Mahavikas Aghadi as per exit poll estimates.saam tv
Published On

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर मतदानाआधीच बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला. आज या उर्वरित जागांसाठी मतदान पार पडले. यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढाई रंगणार असून 22 जून रोजी निकाल लागणार आहे. तत्पूर्वी साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारडं जड असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

बिनविरोध विजयी उमेदवार

वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर: अरुण लखानी (भाजप)

अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे (भाजप)

ठाणे: रवींद्र फाटक (शिवसेना-शिंदे गट)

यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना-शिंदे गट)

रायगढ़-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: अनिकेत तटकरे (NCP अजित पवार गट)

पुणे: विक्रम काकडे (NCP अजित पवार गट )

या सगळ्या मतदारसंघाची आकडेवारी खालीलप्रमाणे:

साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार आकडेवारी

सोलापुर: राजेंद्र राऊत (भाजप) - 505 संभाव्य मते

वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार) 110 संभाव्य मते

जळगाव: नंदकिशोर महाजन (भाजप) - 415 संभाव्य मते

शरद तायडे (ठाकरे गट) - 70 संभाव्य मते

अनिल चौधरी (अपक्ष) - 145 संभाव्य मते

सांगली-सातारा: धैर्यशील कदम (भाजप) - 655 संभाव्य मते

अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार) - 240 संभाव्य मते

किशोर धुमाल (अपक्ष) - 0 संभाव्य मते

नांदेड: अमर राजूरकर (भाजप) - 302 संभाव्य मते

कृष्णा पाटील आष्टीकर पाटील (काँग्रेस) - 124 संभाव्य मते

प्रशांत इंगोले (वंचित)- 6 संभाव्य मते

नागपूर: डॉ. राजीव पोद्दार (भाजप) - 620 संभाव्य मते

अतुल लोंढे (काँग्रेस) - 216 संभाव्य मते

भंडारा-गोंदिया: अविनाश ब्राह्मणकर (भाजप) - 325 संभाव्य मते

नरेश ईश्वरकर (काँग्रेस) - 132 संभाव्य मते

नाशिक: नरेंद्र दराडे (शिवसेना शिंदे गट) - 446 संभाव्य मते

गोकुल गीते (अपक्ष) - 175 संभाव्य मते

अमरावती: प्रवीण पोटे (भाजप) -375 संभाव्य मते

हर्षदीप देशमुख (कांग्रेस) - 5 संभाव्य मते

निलेश विश्वकर्मा (वंचित बहुजन आघाड़ी) - संभाव्य मते

धाराशिव-लातूर-बीड: बसवराज पाटील (भाजप) - 758 संभाव्य मते

महेश देशमुख (कांग्रेस) - 230 संभाव्य मते

परभणी-हिंगोली: सईद खान (शिवसेना शिंदे गट) - 333 संभाव्य मते

डॉ. विवेक नावंदर (ठाकरे गट) - 78 संभाव्य मते

छत्रपती संभाजीनगर-जालना: सुहास शिरसाट (भाजप) - 465 संभाव्य मते

गणेश लोखंडे (ठाकरे गट) - 172 संभाव्य मते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com