नाशिकची वाहतूक कोंडी सुटणार, शहराचा कायापालट होणार; विविध प्रकल्पांसाठी ६,१६२ कोटींची मेगा मंजुरी

Maharashtra Government Approval For Kumbh Mela Projects Nashik: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून ६,१६२ कोटींच्या ६८ पायाभूत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून रस्ते, घाट, पाणीपुरवठा, सुरक्षा आणि विमानतळ विस्तारासह मोठ्या विकासकामांना गती मिळणार आहे.
Preparations intensify in Nashik as massive infrastructure projects worth ₹6,162 crore are approved for the upcoming Kumbh Mela.
Preparations intensify in Nashik as massive infrastructure projects worth ₹6,162 crore are approved for the upcoming Kumbh Mela.saam tv
Published On

विक्रांत मते, प्रतिनिधि

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्य सरकारने ६,१६२ कोटी ७८ लाख रुपयांच्या ६८ पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. नगर विकास विभागाने शासन निर्णय जारी केल्यानंतर रस्ते, घाट, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा आणि डिजिटल व्यवस्थांच्या कामांना गती मिळणार आहे. शासनाने मंजूर निधी टप्प्याटप्प्याने वितरित करून तांत्रिक व आर्थिक तपासणीनंतरच अंतिम मंजुरी देण्याचे स्पष्ट केले आहे.

Preparations intensify in Nashik as massive infrastructure projects worth ₹6,162 crore are approved for the upcoming Kumbh Mela.
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; परभणी-हिंगोलीच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा

टप्पा एक आणि टप्पा दोनमधील २५ कोटींवरील ६८ प्रकल्पांचा समावेश आहे. ४४ प्रकल्पांसाठी ३,५९२.३० कोटी, १६ प्रकल्पांसाठी १,५०७.२८ कोटी, ८ प्रकल्पांसाठी १,०६३.२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आणि खर्चात अवाजवी वाढ न होण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कुंभस्नानासाठी गोदावरी नदीवर टाकळी, ओढा, दसक परिसर आणि त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाट उभारणे, विद्यमान घाटांचा विकास आणि नदीकाठ सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. नवीन प्रशासकीय इमारत, भूमिगत वीजवाहिन्या, नवीन वीज वितरण यंत्रणा, साधुग्राम वीजपुरवठा आणि बहुउद्देशीय पोलिस इमारत यांसारख्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

Preparations intensify in Nashik as massive infrastructure projects worth ₹6,162 crore are approved for the upcoming Kumbh Mela.
Salman Khan Video : "60 साल का हो गया हूँ, लेकीन लडना नहीं भूला..."; सलमान खान कुणावर भडकला?

रस्ते आणि वाहतूक

महापालिकेमार्फत शहरातील प्रमुख मार्गांचे रुंदीकरण आणि विकास हाती घेतला जाणार

वडनेर गेट ते विहितगाव, गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, नांदूर पूल ते जत्रा हॉटेल, पेठ रोड, दिंडोरी रोड या मार्गांसाठी मोठा निधी

घाटांपर्यंत पोहोच सुलभ करणे आणि वाहतूक व्यवस्थापनावर भर

सुरक्षा आणि डिजिटल व्यवस्था

सीसीटीव्ही सर्व्हेलन्स आणि स्मार्टसिटी घटकांसाठी ३७१.७० कोटी

नाशिक- त्र्यंबकेश्वर नेटवर्क उभारणीसाठी १२८.९८ कोटी

Preparations intensify in Nashik as massive infrastructure projects worth ₹6,162 crore are approved for the upcoming Kumbh Mela.
Kalyan Crime: कल्याणमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला, २ तरुणांकडून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण

पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा

विल्होळी येथे जलशुद्धीकरण केंद्र, पाणीपुरवठा यंत्रणा बळकट करणे

साधुग्रामपर्यंत मुख्य गुरुत्ववाहिनी टाकण्यासाठी ३९५.७८ कोटी मंजूर

त्र्यंबकेश्वरसाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेलाही मंजुरी मिळाली आहे.

ओझर विमानतळाचा विस्तार

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ओझर विमानतळ विकास आणि एकात्मिक टर्मिनल इमारतीसाठी ५७२.५१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा सर्वात मोठा एकल प्रकल्प आहे.

प्रकल्पांची संख्या- मंजूर निधी (कोटींमध्ये)

४४ प्रकल्प- ३,५९२.३०

१६ प्रकल्प- १,५०७.२८

८ प्रकल्प- १,०६३.२०

एकूण ६८ प्रकल्प- ६,१६२.७८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com