Salman Khan Video : "60 साल का हो गया हूँ, लेकीन लडना नहीं भूला..."; सलमान खान कुणावर भडकला?

Salman Khan Angry On Paparazzi : सलमान खानने सोशल मीडियावर कठोर शब्दात पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्या तुफान व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये सलमान खान प्रचंड भडकलेला दिसत आहे.
Salman Khan Angry On Paparazzi
Salman Khan VideoSAAM TV
Published On
Summary

सलमान खानने सोशल मीडियावर कठोर शब्दात पोस्ट शेअर केल्या.

सलमान म्हणाला- "60 साल का हो गया हूँ, लेकीन लडना नहीं भूला..."

सलमान खान रुग्णालयाबाहेर स्पॉट झाला.

भाईजानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात पापाराझींनी सलमान खानला मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलबाहेर स्पॉट केले. मात्र पापाराझींच्या गोंधळामुळे सलमान खान प्रचंड भडकला. फोटोग्राफर्सवर संतापून त्यांना खडसावले. घडलेल्या प्रकारानंतर सलमानने आता सोशल मीडियावर ४ पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यात त्यांनी पापाराझींना चांगलेच फटकारले आहे. हॉस्पिटलबाहेरील पापाराझींच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सलमानने ४ फोटो शेअर करून त्याखाली मेसेज लिहिला आहे. हॉस्पिटल बाहेर गोंधळ आणि ओरडाओरडा करणाऱ्या फोटोग्राफर्सना उद्देशून भावनिक आणि संतप्त मेसेज लिहिले आहेत. तसेच फोटोंमध्ये सलमान खान रागवलेला दिसत आहे.

पहिली पोस्ट

"जर मला हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रेसला माझ्या वेदनांचा आनंद घेताना दिसला. मी ज्या माध्यमांसाठी उभा राहिलो, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचीही पोटापाण्याची सोय व्हावी याची काळजी घेतली आणि तेही आपली उपजीविका मिळवू शकतील याची खात्री केली."

दुसरी पोस्ट

"पण जर त्यांना माझ्या नुकसानातून पैसे कमवायचे असतील तर...शांत राहा आनंद घेऊ नका. भाई भाई भाई मातृभूमी पिक्चर की, माँ की आंख, पिक्चर महत्त्वाचा आहे की आयुष्य..."

तिसरी पोस्ट

"ऐसे में सौ जला दूंगा... भाई के एक भाई के दुख पर अगली बार कोशिश कर लेना मेरे साथ... बस कोशिश कर लेना... जब भी तुम्हारा कोई हॉस्पिटल मै होगा क्या मै ऐसा करूंगा ?"

चौथी पोस्ट

"साथ साथ का हो गया हूँ लेकीन लडना नहीं भूला, ये याद रख लेना, जेल में डालो गे हा हा..."

व्हायरल व्हिडीओत सलमान खान हॉस्पिटलच्या आवारातून बाहेर पडताच, काही फोटोग्राफर्सनी त्याचे लक्ष वेधण्यासाठी "भाई भाई" असे ओरडायला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्याने त्यांना हॉस्पिटलजवळ शांत राहण्यास सांगितले आणि प्रश्न विचारला की, "जर तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य येथे दाखल झाला असता तर तुमची प्रतिक्रिया काय असती..."

सलमान खानचे आगामी प्रोजेक्ट

सलमान खानचा 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' चित्रपट १४ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सलमान खान सध्या तेलुगू चित्रपट दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्यासोबत चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. नुकताच सलमान खान रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दिसला.

Salman Khan Angry On Paparazzi
Bharti Singh Divorce : भारती सिंगचा ९ वर्षानंतर संसार मोडणार? कॉमेडी क्वीनने नात्याबद्दल केला मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com