Pune : पुण्यातील हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार! १३ तासांच्या उपचारासाठी रुग्णालयाने उकळले ३ लाखांचं बील, नागरिकांमध्ये संताप

Pune News : पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये १३ तासांच्या उपचारासाठी ३.२५ लाखांचे बिल आकारल्याचा आणि विमा मंजुरीशिवाय मृतदेह देण्यास नकार दिल्याचा आरोप. या घटनेमुळे वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
PUNE HOSPITAL CONTROVERSY: ₹3.25 LAKH BILL FOR 13 HOURS, BODY RELEASE ROW
PUNE HOSPITAL CONTROVERSY: ₹3.25 LAKH BILL FOR 13 HOURS, BODY RELEASE ROWSaam Tv
Published On
Summary
  • १३ तासांच्या उपचारासाठी ३.२५ लाखांचे बिल आकारल्याचा आरोप

  • विमा मंजुरीशिवाय मृतदेह देण्यास नकार

  • कुटुंबीयांचा संताप, कायदेशीर लढ्याचा इशारा

  • खासगी रुग्णालयांच्या खर्चावर पुन्हा प्रश्नचिन्ह

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाच्या निधनानंतर अवघ्या १३ तासांच्या उपचारांसाठी तब्बल ३ लाख २५ हजारांचे बिल आकारण्यात आले. तसेच विम्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मृत तरुणाच्या कुटुंबियांना मृतदेह देण्यास रुग्णालय प्रशासनाने नाकारले. दरम्यान या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने मृताच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धानोरी परिसरातील मुंजाबा वस्ती येथे राहणारे निलेश चंद्रभान चत्तर (वय ३१) यांना प्रकृती बिघडल्याने काल सकाळी १० वाजता जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री ११:०५ वाजता त्यांचे निधन झाले. आधीच महिनाभरापूर्वी वडिलांचे निधन झाल्याने चत्तर कुटुंब कोसळले .

PUNE HOSPITAL CONTROVERSY: ₹3.25 LAKH BILL FOR 13 HOURS, BODY RELEASE ROW
Kitchen Hacks : तुम्ही खरेदी केलेले लसूण रासायनिक की नैसर्गिक; 'या' ५ पद्धतीने ओळखा

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, निलेश यांच्यावर कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करण्यात आलेली नव्हती. तरीही अवघ्या १३ तासांत ३.२५ लाख रुपयांचे बिल देण्यात आले, जे अत्यंत चुकीचं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, रुग्णाकडे विमा संरक्षण उपलब्ध असूनही सुरुवातीला ५० हजार रुपयांची डिपॉझिट रक्कम घेतली गेली होती.

PUNE HOSPITAL CONTROVERSY: ₹3.25 LAKH BILL FOR 13 HOURS, BODY RELEASE ROW
Cancer : फक्त दारू, सिगारेट नव्हे तर 'या' नेहमीच्या वापरातील गोष्टींमुळेही होतो कॅन्सर

निलेश यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विनंती केली. मात्र “इन्शुरन्स अप्रूव्हल मिळाल्याशिवाय मृतदेह देणार नाही,” अशी भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे नातेवाईकांना रात्रभर हॉस्पिटलच्या बाहेर थांबावे लागले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखालील रुग्णालयात अशी वागणूक दिली जात असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

PUNE HOSPITAL CONTROVERSY: ₹3.25 LAKH BILL FOR 13 HOURS, BODY RELEASE ROW
Shocking : धक्कादायक! हॉटेलच्या बंद खोलीत तरुणी आणि पुरुष नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच भयंकर सत्य आलं समोर

या प्रकरणी स्थानिक नगरसेवक सुभाष टिंगरे यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. निलेश यांच्या कुटुंबीयांनीही या अन्यायाविरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुण्यातील खासगी रुग्णालयांतील वाढत्या वैद्यकीय खर्चाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोग्य यंत्रणेकडून कडक नियंत्रण आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com