भारती सिंगच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाचा ९ वर्षांचा संसार मोडणार असल्याचे बोले जात आहे.
कॉमेडी क्वीनने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.
टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रायचा नुकताच घटस्फोट झाला आहे. मौनीच्या घटस्फोटनंतर टिव्हीची आणखी एक प्रसिद्ध जोडी वेगळी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ही जोडी दुसरी तिसरी कोणी नसून कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि लेखक हर्ष लिंबाचिया आहे. भारती सिंग हा टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. भारती आणि हर्षचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अशात भारती सिंगने घटस्फोटाच्या अफवांवर मोठा खुलासा केला आहे. भारती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
भारती सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दोघांचे युट्यूब चॅनल देखील आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती ते आपल्या चाहत्यांना देतात. भारतीने नुकत्याच एका व्लॉगमध्ये घटस्फोटच्या चर्चा खोट्या असल्याचे सांगितले आहे. तसेच दोघे आनंदाने एकत्र राहत असल्याचेही सांगितले. ती म्हणाली, "अनेक वाईट अफवा पसरत आहेत ज्या पूर्णपणे खोट्या आहेत. आम्ही दोघे कधीही वेगळे होऊ शकत नाही, कदाचित मृत्यूनंतरही नाही. भारती आणि हर्ष यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे, किंवा त्यांचे संबंध बिघडले आहेत, अशा अफवा ऐकायला लोकांना मजा येते..."
भारतीने घटस्फोटच्या अफवा फेटाळून लावत म्हटले की, "असं काही नाहीये, आम्ही आमच्या व्लॉग्समध्ये बऱ्याच गोष्टी गंमतीने बोलतो, पण काही माध्यमे त्या उचलून धरतात आणि खऱ्या नसतानाही त्यांना खरं ठरवतात..." हर्षने त्याच इमारतीत दुसरे अपार्टमेंट भाड्याने घेण्याच्या निर्णयाबद्दल भारतीने स्पष्ट केले की, "हर्षने अपार्टमेंट फक्त व्यावसायिक कारणांसाठी भाड्याने घेतले आहे. तो माझ्यासोबतच राहतो आम्ही वेगळे राहत नाही. "
भारती-हर्ष यांची शूटिंग दरम्यान ओळख झाली. त्यानंतर मैत्री आणि मग हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. भारती-हर्ष 2017 ला लग्न बंधनात अडकले. त्यानंतर २०२२ मध्ये भारतीने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. ज्याचे नाव लक्ष (गोल्ला) असे आहे. आता डिसेंबर २०२५ मध्ये भारती-हर्षच्या घरी आणखी एक नवा पाहुणा आला, त्यांना दुसरा मुलगा झाला. ज्याचे नाव यशवीर (काजू) असे आहे. भारती-हर्ष हे प्रेक्षकांचे आवडते कपल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.