Bharti Singh Pregnancy: कॉमेडियन भारती सिंग ४१व्या वर्षी पुन्हा होणार आई; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Bharti Singh Second Pregnancy: कॉमेडियन भारती सिंगच्या गेल्या अनेक वर्षांपासून दुसऱ्या मुलाच्या नियोजनाबद्दल बोलत होती. अखेर तिच्या प्रार्थनांचे फळ मिळाले असून ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.
Bharti Singh Pregnancy
Bharti Singh PregnancySaam tv
Published On

Bharti Singh Second Pregnancy: भारती सिंग पुन्हा आई होणार आहे. ती लवकरच तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया त्यांच्या पहिल्यामुलासह त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी तयार आहेत. भारती आणि हर्ष यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली. फोटोंमध्ये भारती तिच्या बेबी बंप दाखवताना दिसत आहे.

चाहत्यांसाठी एक मजेदार कॅप्शनसह आनंदाची बातमी

भारती सिंगने सोमवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. तिने एक फोटो शेअर केला यामध्ये ती तिच्या बेबी बंपला दाखवताना दिसत आहे. तिच्यासोबत पती हर्ष देखील दिसत आहे. पोस्टसोबत एक मजेदार कॅप्शन आहे, " आम्ही पुन्हा प्रेग्नेंट आहोत."

Bharti Singh Pregnancy
December Release: रणवीर सिंगपासून ते आलिया भट्टपर्यंत...; या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट

परिणीती आणि ओरीसह सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या

भारती सिंग आणि हर्षने त्यांच्या गरोदरपणाची आनंदाची बातमी शेअर करताच, त्यांची पोस्ट शुभेच्छांनी भरली. चाहते, नेटिझन्स आणि अनेक सेलिब्रिटींनीही भारतीचे अभिनंदन केले. परिणीती चोप्राने लिहिले, "अभिनंदन माय गर्ल'" यासह माही विज, ओरी, नीति टेलर आणि विक्रांत यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

Bharti Singh Pregnancy
Actor scandal: 'दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलमध्ये गेला...', प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे पुन्हा गंभीर आरोप, रडत म्हणाली...

हर्ष आणि भारतीचे २०१७ मध्ये लग्न झाले

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ मध्ये लग्न केले. या कपलने २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आता, या कपलने त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. भरत सिंग हा विनोदी कलाकार आहे, तर तिचा पती हर्ष एक लेखक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com