तो सैयारापेक्षा चांगला चित्रपट...; लेक बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत, पण चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच गोविंदाच्या पत्नीचं वक्तव्य

Sunita Ahuja On Yashvardhan Movie: गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा मुलगा यशवर्धन आहुजा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता सुनीताने लेकाच्या पदार्पणाबद्दल मत व्यक्त केल आहे. सांगितले.
Sunita Ahuja On Yashvardhan Movie
Sunita Ahuja On Yashvardhan MovieSaam Tv
Published On

Sunita Ahuja On Yashvardhan Movie: बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सध्या चर्चेत आहे. गोविंदा आणि पत्नी सुनीताच्या घटस्फोटच्या बातम्यांना पूर्ण विराम लागल्यानंतर अलिकडेच एका मुलाखतीत सुनीताने तिचा मुलगा यशवर्धन आहुजाच्या पदार्पणाबद्दल सांगितले. तिने असा दावा केला आहे की यशवर्धनचा पहिला चित्रपट अहान पांडेच्या 'सैयारा'पेक्षा चांगला आहे. एवढेच नाही तर तिने रवीना टंडनची मुलगी राशा थडानीच्या पहिल्या चित्रपट 'आझाद'बद्दलही उघडपणे मत व्यक्त केलं आहे.

सुनीता 'सैयारा'बद्दल काय म्हणाली?

मुलाखतीदरम्यान, सुनीताने सांगितले की चाहते म्हणत आहेत की "यशवर्धन खूप देखणा आहे, तो 'सैयारा'मध्ये असायला हवा होता," तेव्हा सुनीता हसली आणि म्हणाली, 'काश! पण यश त्यापेक्षा चांगला चित्रपट करत आहे.' तिने पुढे सांगितले की तिने अहान पांडेचा पहिला चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, परंतु तिचा मुलगा यशने हा चित्रपट दोनदा पाहिला. सुनीता म्हणाली, 'मीही हा चित्रपट बघणार आहे. माझ्याकडून सर्व नवीन मुलांना शुभेच्छा.

Sunita Ahuja On Yashvardhan Movie
Bigg Boss 19: बिग बॉसमध्ये 'या' स्पर्धकाच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षक नाराज; दिला पहिलं एलिमिनेट करण्याचा सल्ला

गोविंदासारखा होऊ नको

सुनीता पुढे म्हणाली की तिने यशला लग्नासाठी गोविंदासारखा होऊ नको असे सांगितले होते, तो तुम्हाला ९० च्या दशकातील गोष्टी सांगेल. आता सर्व काही बदलले आहे. त्यामुळे लग्नासाठी त्याचा सल्ला कधीच घेऊ नको असे सांगितले आहे.

Sunita Ahuja On Yashvardhan Movie
Prasad Oak: रील्स म्हणजे अभिनय नाही...; प्रसाद ओकच्या वक्तव्याने रंगली चर्चा, सोशल मीडियावर नवा वाद पेटणार

राशा थडानीच्या पदार्पणाबद्दल तिने काय म्हटले?

रवीना टंडनची मुलगी राशाबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली, 'यशशी तिची चांगली मैत्री आहे पण मी तिला अजून भेटले नाही. रवीनाने मला चित्रपटाच्या ट्रायलसाठी बोलावले होते, परंतु मी पूजासाठी जयपूरला गेलो होते म्हणून मी जाऊ शकलो नाही. नंतर मी थिएटरमध्ये चित्रपट पाहिला, मला तो खूप आवडला. राशा खूप गोड आहे, तिला पाहून मला रवीनाचे बालपण आठवते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com