Maha Kumbh 2025
Maha Kumbh Mela 2025 - महाकुंभ मेळा २०२५ : एका तपानंतर म्हणजेच दर १२ वर्षांनी भरणारा महाकुंभमेळा यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये होणार आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक महाउत्सव असलेला कुंभमेळामेळा गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांच्या संगमावर आयोजित करण्यात येतो. भव्यदिव्य असलेल्या या महाकुंभमेळ्यात कोट्यवधींच्या संख्येनं भाविक, संत-महंत आणि पर्यटकही येतात आणि या अद्भूत, अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार होतात.
दर १२ वर्षांनी हा महाकुंभ मेळा भरवला जातो. या कुंभमेळ्यात शाहीस्नानाला विशेष महत्व आहे. मेळ्यात स्नान केल्यानं पुण्य मिळतं आणि जीवनात भरभराट-समृद्धी येते, अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे.