नाशिक कुंभमेळा २०२७-२८ साठी राज्य शासनाने दोन समित्यांची स्थापना केली.
गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्षपद देण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची स्थापना झाली.
महायुतीतील नाराज नेत्यांना स्थान देऊन नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महायुतीतील नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू झाला आहे. अखेर राज्य शासनाने कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समिती या दोन महत्त्वाच्या समित्यांची स्थापना केली आहे. कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्ष म्हणून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या समितीत छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि जयकुमार रावल यांना स्थान देण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारी, आढावा बैठक आणि कामांच्या कंत्राटांवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. नाशिकच्या हेवीवेट मंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी या समितीत त्यांना वर्णी लावण्यात आल्याचे दिसते. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन हे नेहमी बैठक घेत असता, मात्र या बैठकीत भाजप सोडला तर मित्र पक्षातील कुठेलेही नेत्यांना आमंत्रण नसते.
तसेच काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील कुंभमेळा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालायात बैठक घेत काही सूचना केल्या होत्या आणि काम जलदगतीने होत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. तर त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बैठक घेतली होती आणि या बैठकीत गिरीश महाजन यांना आमंत्रण नव्हते. यामुळे महायुतीमध्ये नाराजीचा सुर उमटत होता. या सगळ्याच तोडगा म्हणून आता ही शिखर समिति स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार असून, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच विविध विभागांचे सचिव व अधिकारी यांचा समावेश या समितीत करण्यात आला आहे. याशिवाय कार्यकारी समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.याआधी कुंभमेळा प्राधिकरणाचीही स्थापना झाली असून, सिंहस्थ २०२७-२८ निर्विघ्न पार पडण्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर नियोजन सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.