Raj Thackeray : निवडणुकीत गाफील राहू नका, कारण...; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना महत्वाचा आदेश

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. मतदार याद्यांचा अभ्यास करा, मतं चोरीला जातात म्हणून गाफील राहू नका, असा सल्ला देत त्यांनी अंबरनाथची नवी कार्यकारिणीही जाहीर केली.
Raj Thackeray
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On
Summary
  • अंबरनाथ दौऱ्यात राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

  • मतदार याद्यांचा अभ्यास करा, मतं चोरीला जातात – राज ठाकरे

  • अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणी जाहीर

  • कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीसाठी उत्साह

अजय दुधाणे, अंबरनाथ

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथमध्ये पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणुकीत गाफील राहू नका, मतदार आपल्याला मतदान करतात, मात्र ही मतं चोरीला जातात. त्यामुळे मतदार याद्यांचा अभ्यास करा, प्रत्येक यादीवर २ बीएलओ नेमा आणि गटअध्यक्षांना याद्यांची जबाबदारी वाटून द्या, असे आदेश दिले. यावेळी अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणीही राज ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथ शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मतदार याद्यांवर अभ्यास करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. अंबरनाथच्या पनवेलकर हॉलमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळावा घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Raj Thackeray
Janaakrosh Morcha : जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न, बच्चू कडू यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा

मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत त्यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही. मनसेतून नुकत्याच शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांबाबतही राज ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही. मात्र अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणी त्यांनी यावेळी जाहीर केली. या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून शहर संघटक, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष अशा अनेक नियुक्त्या या नव्या कार्यकारणीत करण्यात आल्या आहेत.

Raj Thackeray
Crime News : प्रसिद्ध मॉलमध्ये सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी; IT कर्मचाऱ्याला बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकार?

तर वादात सापडलेल्या काही जुन्या चेहऱ्यांना मात्र नव्या कार्यकारणीतून हटवण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या या अंबरनाथ दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून निवडणुकीसाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com