Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम, म्हणाले - 'माफी मागायचा विषयच नाही'

Gopichand Padalkar Controversial Remarks: गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन करून सल्लाही दिला. तरी देखील पडळकर आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम, म्हणाले - 'माफी मागायचा विषयच नाही'
Gopichand Padalkar Controversial Remarks Saam TV News
Published On

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यभर गोपीचंद पळकर यांच्याविरोधात जोरदार आंदोलनं केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना फोन करून सल्ला दिला. तरी देखील पडळकर हे जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ठाम आहेत. 'पंतप्रधानांच्या आईवर एआयच्या माध्यमातून टीका झाली त्यावेळी शरद पवारांनी फोन केला होता का? त्यामुळे माफी मागायचा काय विषय येत नाही. '

जयंत पाटील यांच्यावरील गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टिकेचे मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना फोन करत सल्ला दिला. यापुढे अशा टीका न करण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना सूचना देण्यात आल्या. तर मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचा यापुढे पालन करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील यांच्यावरील जहरी टिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना सबुरीचा सल्ला दिला.

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम, म्हणाले - 'माफी मागायचा विषयच नाही'
Gopichand Padalkar: यवत घटनेतील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,गोपीचंद पडळकरांचा संताप, काय म्हणाले? VIDEO

गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यावर जोरदार टीका केली. 'जयंत पाटील यांच्याविरुद्ध वापरलेली अर्वाच्य, घाणेरडी आणि अमानुष भाषा ही फक्त एका व्यक्तीचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अवमान आहे. पडळकरांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे आपल्या पवित्र परंपरेवर डाग लागतो आहे. महाराष्ट्र अशा नीच आणि अमानवी भाषेला कधीही सहन करणार नाही हा अपमान सोडून दिला जाणार नाही. भाजप स्वतःला संस्कृती आणि मूल्यांचा रक्षक म्हणवतो मग त्यांच्या आमदाराच्या या घृणास्पद वक्तव्यावर पक्षाचे नेतृत्व गप्प का आहे? भाजप नेतृत्वाने तात्काळ याबाबत कारवाई करावी.', अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम, म्हणाले - 'माफी मागायचा विषयच नाही'
Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

तर राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यवर प्रतिक्रिया दिली. 'बोलताना संयम हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया आहे. संयमा विना राजकारण हे अजारकता आहे. त्यामुळे संयम आम्हाला अपेक्षित आहे आणि तीच भाजपची भूमिका आहे.', असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. तसंच, पडळकरांच्या या विधानावर नाराजी व्यक्त करत शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून बेलात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, असे सांगितले.

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम, म्हणाले - 'माफी मागायचा विषयच नाही'
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांविषयी बोलताना आमदार सदाभाऊ खोत धाय मोकलून रडले|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com