
Gopichand Padalkar Sharnu Hande News : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे यांचे सोलापूरमधून फिल्मी स्टाइलने अपहरण करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणाचा बदला घेण्यासाठी शरणू हांडेंचे अपहरण केल्याचे म्हटले जात आहे. अपहरणकर्ते मला मारण्याच्या प्रयत्नात असल्याचे शरणू हांडे यांनी पोलिसांना सांगितले.
शरणू हांडे यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. 'माझ्या घरातून दुपारी साडेचारच्या सुमारास माझे अपहरण करण्यात आले. मला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्यात आले. माझ्या पायावर कोयत्याने वार करण्यात आला. त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि माझे पाय बांधले. त्यांनी मला लिंबाल रेल्वे स्टेशनला नेले. एकूण सात अपहरणकर्त्यांपैकी तिघांनी मला मारण्यास विरोध केला, ते तिघे स्टेशनवर उतरले. उर्वरित चौघांसह कार पुढे निघाली.कारमध्ये आरोपींनी पुढे जाऊन सीएनजी गाडीत इंधन भरले. थोड्या किलोमीटरवर गेल्यानंतर कार बंद पडली', असे शरणू हांडे म्हणाले.
'प्रमुख आरोपी अमित सुरवसेने मला आमदार रोहित पवारांना व्हिडीओ कॉलवर माफी मागण्यास सांगितले. त्यांनी मला फासावर लटकवणे, जाळणे आणि नदीत फेकून देणे असा कट रचला होता. त्यांच्याजवळ तलवार, कोयता, हॉकी स्टीक अशा गोष्टी होत्या. पण सुदैवाने योग्य वेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी माझा जीव वाचवला, अशी माहिती हांडे यांनी दिली. जर पोलीस ५ मिनिट उशीर आले असते, तर मी जिवंत नसतो', असेही ते म्हणाले.
अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी ४ पथके तयार करुन आरोपींना शोधण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अपहरणकर्त्यांना अटक केली आणि शरणू हांडे यांना रुग्णालयात दाखल केले. आरोपींकडून तलवार, कोयते, हॉकी स्टीक, दोरी, साड्या, फटाक्यांची माळ, कंडोम, ट्रायपॉड असे सामान पोलिसांनी जप्त केले आहे. हे सामान कशासाठी होते याचा पोलीस तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.