
कल्याणमध्ये पुन्हा मराठी अमराठी वाद
इडली हॉटेल चालकाने मराठी माणसांबद्दल वापरले अपशब्द
मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय इडली हॉटेल चालकाला दिला चोप
अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी
कल्याण : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी विरुद्ध अमराठी हा वाद सुरु आहे. अमराठी लोकांकडून मराठी माणसांवर आणि मराठी भाषेवर अपशब्द वापरले जात असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. अशीच एक घटना मुंबईजवळच्या कल्याण येथून समोर आली आहे. एका हॉटेल चालकाने मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरल्याचे उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद उफाळून आला आहे. एका इडली हॉटले चालकाने मराठी माणसांबाबत अपशब्द वापरत अर्वाच्च विधान केले होते. या घटनेचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल रेकॉर्डिंग नसतान इडली हॉटेल चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अद्दल घडवली.
कल्याणमधील परप्रांतीय इडली हॉटेल चालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. त्याच्या हॉटेलसमोरच कार्यकर्त्यांनी हॉटेल चालकाला चोप दिला. त्यानंतर हॉटेल चालकाने सर्वांची माफी मागितली. हॉटेल चालकाचा माज मनसेच्या कार्यकर्त्यांनी उतरवला आहे. ही सदर घटना कल्याण पूर्वेकडील दुर्गा माता मंदिर परिसरात घडली आहे.
नवी मुंबईतही मराठी विरुद्ध अमराठी वाद
नवी मुंबईच्या खारघरमध्ये मराठी-अमराठी वाद झाल्याचे उघडकीस आले. गणेश मंडळाच्या कार्यकर्ते आणि परप्रांतीय दुकानदार यांच्या वाद झाला. आमचं दुकान मराठी माणसांमुळे चालत नाही असे म्हणत परप्रांतीय दुकानदाराने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसमोर माज दाखवला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला अद्दल घडवल्यानंतर त्याने माफी मागितली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.