Gopichand Padalkar News: गोपीचंद पडळकरांना जोडे मारणाऱ्याला १ लाखांचं बक्षिस; नागपूरात कार्यकर्ते आक्रमक

Maharashtra Political News: गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
Gopichand Padalkar News
Gopichand Padalkar NewsSaam TV

संजय डाफ

Nagpur News:

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. पडळकरांना जोडे मारा आणि एक लाखांचे बक्षीस मिळवा, अशा पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आंदोलन केलं जात आहे. (Latest Marathi News)

Gopichand Padalkar News
Gopichand Padalkar News | गोपीचंद पडळकरांच्या त्या वक्तव्यावर भाजप नेत्यांची सावध प्रतिक्रिया?

"आमदार गोपीचंद पडळकर मंगळसूत्र चोर असून त्यांना जोडे मारणाऱ्यास एक लाखंचे बक्षीस देऊ.", आशी घोषणा राष्ट्रवादीचे नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता.

आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पडळकर यांना पक्षातील कार्यकर्त्यांनी मारल्यास १ लाख रुपयांचं बक्षिस देणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच पडळकर नागपुरात आल्यास आमच्या स्टाईलने त्यांना धडा शिकवू, असा इशाराही देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेत टिका केली होती. त्याला सोलापूरच्या संजय सरक या शेतकऱ्याने अजित पवारांची हुबेहूब मिमिक्री करत उत्तर दिलं आहे. अजितदादांच्या आवाजात उत्तर दिल्यामुळे सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरलं होत आहे.

अजित पवार यांच्या बद्दल गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक आक्रमक झाली आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच घोषणाबाजी करण्यात येत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकर सारख्या वाचाळवीरांना वेळीच आवर घालावी व पक्षातून काढावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी केलीये.

राज्यभरात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आंदोलन करतआहे. नांदेडमध्ये देखील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आंदोलन केले. नांदेड शहरातील आयटीआय चौकात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलेय. पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gopichand Padalkar News
Political News: रामदास आठवलेंच्या पक्षात गँगस्टरची एन्ट्री; मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com