Political News: रामदास आठवलेंच्या पक्षात गँगस्टरची एन्ट्री; मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी

Gangster Harish Mandvikar join RPI: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या पक्षात गँगस्टरला एन्ट्री दिली आहे.
Gangster Harish Mandvikar join  Republican Party of India Ramdas Athawale party
Gangster Harish Mandvikar join Republican Party of India Ramdas Athawale partySaam TV

सचिन गाड, साम टीव्ही

Gangster Harish Mandvikar join RPI Party

आगामी लोकसभा, विधानसभा तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी वेगवेगळी रणनिती आखली जात आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gangster Harish Mandvikar join  Republican Party of India Ramdas Athawale party
Maharashtra Politics: राज्याला लवकरच महिला मुख्यमंत्री मिळणार? महिला आरक्षण विधेयकामुळे चर्चेला उधाण

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या पक्षात गँगस्टरला एन्ट्री दिली आहे. गँगस्टर रामा गणिगा मांडवीकर उर्फ हरीश मांडवीकर याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्याच्या प्रवेशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज मुंबईत गँगस्टर हरीश मांडविकर याने आरपीआयमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश होताच रामदास आठवले यांनी त्याच्यावर मुंबई प्रदेश उपाध्यक्ष पदाची दिली जबाबदारी दिल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

इतकंच नाही, तर हरीश मांडवीकर याचा कांदिवलीचे समाजसेवक असा उल्लेख करण्यात आला आहे.रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष सध्या एनडीएमधील घटकपक्ष आहे. अशातच आरपीआयमध्ये एका गँगस्टरने प्रवेश केल्यामुळे यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

कोण आहे हरिष मांडवीकर?

हरीश मांडवीकर हा गँगस्टर असून त्याच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहे. मटका किंग सुरेश भगत हत्या प्रकरणात मांडविकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या(एटीएस) साक्षीदारास कारागृहातून धमकावल्या प्रकरणी हरीश मांडवीकर याच्यासह चौघांना अटक केली होती.

सुरेश भगत हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या मांडवीकर याने आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून आणखी गुन्हे केले असावेत असा संशय एटीएस अधिकाऱ्यांना आहे. कारागृहात भेटण्यासाठी किंवा वस्तू पोच करण्यासाठी येणाऱ्या आपल्या पत्नीला मांडवीकर हा चिठ्ठ्या पाठवत होता. या प्रकारे त्याने कारागृहात बसून अनेक गुन्हे केले आहेत.

Edited by - Satish Daud

Gangster Harish Mandvikar join  Republican Party of India Ramdas Athawale party
Shocking News: पत्नीचा सासरी येण्यास नकार, पती संतापला; ४ महिन्यांच्या बाळाला रस्त्यावर आपटलं, भयंकर घटना!

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com