Ashish Shelar: निवडणूक तोंडावर तरीही का बदलला मुंबई भाजप अध्यक्ष? आशिष शेलार यांनी सांगितली रणनीती

Ashish Shelar Comment On Mumbai President: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अगदी आधी, भाजपने त्यांचे मुंबई अध्यक्ष बदलले. आशिष शेलार यांनी या मोठ्या राजकीय हालचालीमागील रणनीती उघड केली.
Ashish Shelar Comment On Mumbai President
BJP appoints Amit Satam as new Mumbai president; Ashish Shelar reveals party’s election strategysaam tv
Published On
Summary
  • मुंबई भाजप अध्यक्ष बदलून अमित साटम यांची नियुक्ती झाली.

  • निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निर्णयामुळे चर्चा रंगल्या.

  • आशिष शेलार यांनी या बदलामागची रणनीती स्पष्ट केली.

  • फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर असताना भाजपमध्ये मोठी उलथापालथ झालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत नव्या मुंबई अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या कार्यकारणीने असा निर्णय घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता मुंबई भाजपचे सूत्र आमदार अमित साटम यांच्या हाती असणार आहेत. पण भाजपने असा निर्णय का घेतला? त्यामागे काय रणनीती आहे. याची माहिती भाजप नेते आणि राज्य सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिलीय.

साम टीव्हीच्या ब्लॅक अँण्ड व्हाईट या सदरात दिलेल्या मुलाखतीत आशिष शेलार यांनी भाजपची रणनीती सांगितलीय. मुंबई महापालिकेत भाजपची रणनीती काय? मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपचा प्लॅन काय? मराठीबाबत भाजपची काय भूमिका आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर आशिष शेलार यांनी दिली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com