IAS Transfers: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रशासनात उलथापालथ; जिल्हाधिकाऱ्यांची बदली, दोन IAS अधिकारी आले!

Ahead of Sinhastha Kumbh 2027: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. जलज शर्मा यांची बदली होऊन आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
Ayush Prasad takes charge as the new Nashik District Collector; major IAS reshuffle in Maharashtra ahead of the Kumbh Mela 2027.
Ayush Prasad takes charge as the new Nashik District Collector; major IAS reshuffle in Maharashtra ahead of the Kumbh Mela 2027.Saam Tv
Published On

राज्यातील प्रमुख जिल्हयांपैकी एक असणाऱ्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून् नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या आधीची बदली झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Ayush Prasad takes charge as the new Nashik District Collector; major IAS reshuffle in Maharashtra ahead of the Kumbh Mela 2027.
Maharashtra Infrastructure: मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! दोन रेल्वे मार्गांना मंजुरी; कोणाला होणार फायदा?

जलज शर्मा यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाचा पदभार काढून घेत त्यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाचे आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Ayush Prasad takes charge as the new Nashik District Collector; major IAS reshuffle in Maharashtra ahead of the Kumbh Mela 2027.
Gram Panchayat Fund: किती निधी आला? कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीचा कारभार नागरिकांना थेट मोबाईलवर पाहता येणार

तसेच राज्यातील आज दहा आयएएस अधिकऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये जलज शर्मा यांच्यासह नऊ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Ayush Prasad takes charge as the new Nashik District Collector; major IAS reshuffle in Maharashtra ahead of the Kumbh Mela 2027.
Chhagan Bhujbal: उठले की हॉस्पिटल, सुटले की पुन्हा हॉस्पिटल, पिऊन पिऊन किडनी खराब; मनोज जरांगेंवर कुणी केला गंभीर आरोप?

कोणत्या IAS अधिकाऱ्यांची कुठे बदली?

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (NMRDA) महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुघे यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलटे यांची साखर आयुक्त, पुणे या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com