Gram Panchayat Fund: किती निधी आला? कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीचा कारभार नागरिकांना थेट मोबाईलवर पाहता येणार

eGramSwaraj Mobile Application: या पोर्टलमुळे गावातील विकासकामांचे नाव, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च आणि कामाची सद्यस्थिती काय आहे, अशा सर्व तपशीलांसह माहिती मिळेल. त्यामुळे ग्रामस्थ सुरू असलेल्या कामांवर लक्ष ठेवू शकतात.
eGramSwaraj  Mobile Application
Citizens can now track Gram Panchayat fund details and village development works through the eGramSwaraj mobile app.saam tv
Published On
Summary
  • ‘ई-ग्रामस्वराज’ अ‍ॅपमुळे ग्रामपंचायतीच्या निधीविषयी माहिती नागरिकांना मोबाईलवर मिळेल.

  • कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर झाला, किती खर्च झाला, कोणत्या प्रकल्पावर काम सुरू आहे याची माहिती मिळणार.

  • ई-ग्रामस्वराज अ‍ॅप Google Play Store आणि egramswaraj.gov.in या पोर्टलवर वरून डाऊनलोड करता येणार.

ग्राम पंचायतीत विकासकामांसाठी किती निधी येतो, किती आणि कुठे खर्च होतो, या गावातील नागरिकांना थांगपत्ता लागत नाही. कोणत्या कामासाठी निधी किती वापरला याचीही माहिती, निधी किती मंजूर झाला याची माहिती ग्रामस्थांना घरबसल्या मोबाइलवर मिळणार आहे. ग्रामपंचायतीतील निधीचा वापर पारदर्शकपणे व्हावा, यासाठी सरकारनं ‘ई-ग्रामस्वराज’ पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅप आणले आहे. यातून नागरिकांना ग्रामपंचायतीतील निधीचा वापर किती पारदर्शकपणे होतोय याची माहिती मिळेल.

ग्राम पंचायतींना वित्त आयोगाकडून मोठा निधी मिळतो. पण तो निधी प्रत्यक्षात कोणत्या कामांसाठी वापरला जातोय, हे ग्रामस्थांना समजत नव्हतं. खर्चाची माहिती घेण्यासाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे जावे लागत होतं. मात्र आता, ‘ई-ग्रामस्वराज’ पोर्टलमुळे ग्रामस्थांना ही सर्व माहिती थेट त्यांच्या मोबाइलवर मिळेल.

eGramSwaraj  Mobile Application
Maharashtra Government: राज्य सरकार मोठा निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

या पोर्टलवर गावामधील विकासकामांचे नाव, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, आणि कामाची सद्यस्थिती अशी सर्व माहिती उपलब्ध असेन. त्यामुळे ग्रामस्थ सुरू असलेल्या कामांवर लक्ष ठेवू शकतील. निधीचा योग्य वापर झाला आहे का, याची पडताळणी नागरिक करू शकतील.

या पोर्टलवर केवळ आर्थिक व्यवहार नाही तर ग्रामपंचायतीने तयार केलेला वार्षिक विकास आराखडा, ग्रामसभांतील निर्णय, गावाची लोकसंख्या, क्षेत्रफळ, निवडून आलेले सदस्य याची माहितीही गावकऱ्यांना मिळेल.

दरम्यान ‘ई-ग्रामस्वराज’ अ‍ॅप वापरण्यासाठी कोणत्याही लॉग-इन किंवा पासवर्डची गरज नसेन. ही माहिती सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध राहिल. ही माहिती कधीही पाहू शकतो. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनण्यास मदत होईल. तुम्हालाही ग्रामपंचायतीच्या कामांवर लक्ष ठेवायचं असेल तर तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून ‘eGramSwaraj’ अ‍ॅप डाउनलोड करू शकतात.

eGramSwaraj  Mobile Application
Latur News : महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला घातला दारूच्या बाटल्याचा हार; दारूविक्री विरोधात महिला आक्रमक

अ‍ॅप कसे वापरणार?

‘eGramSwaraj’ अ‍ॅप डाउनलोड करा

ग्रामपंचायत पर्याय निवडा.

त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतीचे नाव निवडा

त्यानंतर गावातील खर्च, कामांची माहिती आणि ग्रामसभेचे निर्णय पाहता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com