Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Gram Panchayat Polls Criteria: महाराष्ट्र सरकार ग्रामीण भागात मोठ्या सुधारणांची योजना आणत आहे. गेल्या ५ वर्षात कोणतेही थकबाकी नसलेले व्यक्तीच आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीस पात्र असतील.
Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू
Published On
Summary
  • ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू होणार.

  • ५ वर्षांत थकबाकी नसलेली व्यक्तीच निवडणुकीस पात्र.

  • समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कर थकबाकीवर ५०% माफी.

ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची आहे? मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जर निवडणूक लढवायची असेल तर सरकारनं लागू केलेली नवी पात्रता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कारण आता पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे.

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू
Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

ग्रामपंचायतींच्या कराची थकबाकी मोठी आहे, हे कमी करणं एक मोठं आव्हान ठरतेय. यासाठी शासनस्तरावर लवकरच मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत. यात समृद्ध पंचायतराज अभियान काळात एकरकमी कर भरल्यास ५० टक्के करमाफी देण्यात येणार आहे. तर पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीय.

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू
Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

मंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरातील सरपंच कार्यशाळेत ग्रामविकास मंत्री बोलत होते. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. गावातील प्रश्न गावातच सुटण्यासाठी ग्रामविकास काम करत आहे. शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यासाठी करण्यासाठी 'समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येत असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिलीय.

गावामधील थकीत कराची मोठी समस्या असते. हा कर नियमितपणे शासनाच्या तिजोरीत जमा होण्यासाठी अभियान कालावधीत एकरकमी कर भरणाऱ्यांना ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं मंत्री गोरे यांनी सांगितलं. कार्यशाळेत गायरान जमिनीवर घरकुलास परवानगी मिळत नसल्याची तक्रार चपळगावचे सरपंच सिद्धाराम यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घरकुलांसाठी सर्व अटी व नियम शिथिल केले असल्याचं सांगितलं. ९० दिवसात घरकुलांची कामे पूर्ण करायची असतील, तर या अडचणी प्राधान्याने सोडवल्या गेल्या पाहिजेत. वेळ पडली तर नियम बदलू, कायदा बदलू पण कामे थांबली जाणार नाहीत, असे आश्वासन पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com