
भारतात लवकरच पहिली हायपरलूप रेल्वे प्रणाली सुरू होणार आहे. आयआयटी मद्रासच्या स्टार्टअपच्या नेतृत्वाखालील ही हाय-स्पीड तंत्रज्ञान मालवाहतुकीत क्रांती घडवून आणत आहे. या हायपरलू रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार आहेत. दरम्यान भारतातील काही राज्य जगातील पहिले असतील जेथे हायपरलूप रेल्वे व्यवस्था कार्यरत असेन. त्यापैकी एक महाराष्ट्र राज्य असणार आहे.
हो, लवकरच महाराष्ट्रात हायपरलूप रेल्वे सेवा सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने TuTr हायपरलूप सोबत करार केला आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवन बंदराला नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) शी जोडणारी रेषीय इंडक्शन मोटर्स (एलआयएम) वर आधारित हायपरलूप प्रणाली तयार करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास येथील एक स्टार्टअप हायपरलूप तंत्रज्ञान विकसित करत आहे.
हायपरलूप व्हॅक्यूमद्वारे चुंबकीय उत्सर्जनाचा वापर करत लोक आणि वस्तू ताशी ७०० मैलांच्या विक्रमी वेगाने वाहून नेली जातात. ट्रान्सपोर्ट ट्यूब अत्यंत वेगाने प्रवास करू शकतात. कारण ट्यूबच्या पुढील बाजूस असलेलं व्हॅक्यूम हवेच्या प्रतिकारशक्तीला कमी करते, त्यामुळे जलद गतीने प्रवास होतो. भारताचा अशा काही मोजक्या देशांमध्ये समावेश आहे जिथे या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय.
या प्रकल्पाचा उद्देश दोन प्रमुख बंदर प्रकल्पांमधील मालवाहतुकीला गती देणे आहे. यामुळे बऱ्याच काळपासून असणारे लॉजिस्टिक अडथळे दूर होतील. यामुळे वाढवण बंदर दरवर्षी २५० दशलक्ष टनांपर्यंत मालवाहतूक करेल. तर जेएनपीटीवर भारतातील अर्ध्याहून अधिक कंटेनरयुक्त मालवाहतूक होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान या प्रकल्पासह महाराष्ट्र सरकारने एकूण ४२८.९२ अब्ज भारतीय रुपये (४.९ अब्ज डॉलर्स) चे दहा करार केलेत. यात TuTr हायपरलूप सोबतच्या सामंजस्य कराराचा समावेश आहे. या करारांमुळे २५,८९२ रोजगार निर्माण होतील अशी आशा आहे.
दरम्यान रेल्वे मंत्रालयाच्या प्रेस रिलीजनुसार, भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास, किंवा आयआयटी मद्रासने आधीच त्यांच्या कॅम्पसमध्ये ४२२ मीटर कार्यरत असलेले हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार केलेत. यासाठी त्यांना सरकारी मदत मिळाली आहे. काही साइट्सच्या वृत्तानुसार, या रेल्वेला ताशी ७०० मैलांपेक्षा जास्त वेग असेल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि भारतीय रेल्वेने २४ मैलांच्या व्यावसायिक मार्गाचा पाठपुरावा करण्यासाठी वित्तपुरवठा करण्याची योजना आखलीय. प्रस्तावित हायपरलूपमुळे जेएनपीटी आणि वाढवण दरम्यान मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढेल. तसेच बंदरांवर कंटेनर वाहतुकीत अडथळा निर्माण करणारी रेल्वे आणि रस्ते वाहतूक कोंडी कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.