
राज्य सरकारकडून गाई-म्हशी खरेदीसाठी अनुदान जाहीर.
पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण व पशुवैद्यकीय सेवा मिळणार.
दुग्ध व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आधार.
पशुपालन आता शाश्वत उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत ठरणार.
राज्य शासनाने पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिलाय. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे पशुपालन हा आता केवळ दुय्यम व्यवसाय न राहता शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून समोर येत आहे. आता सरकार पशूपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलीय.
राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून गाई-म्हशी खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. अनुदानासह शेतकऱ्यांना जनावरांच्या संगोपनाचे प्रशिक्षण, पशुवैद्यकीय सेवा देखील शासनाकडून मिळते. त्यामुळे दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळून व्यवसाय सुरू करणे सोपे होणार आहे.
ही आर्थिक मदत अनुदानाच्या स्वरुपात केली जाणार आहे. या योजनेत सामान्य शेतकऱ्याला दोन देशी/संकरीत गायी खरेदीसाठी ५० टक्के म्हणजेच ७८ हजार ४२५ रुपये अनुदान दिले जाईल. तर २ म्हशींच्या गटासाठी ५० टक्के म्हणजेच ८९ हजार ६२९ रुपये अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना २ गायींसाठी ७५ टक्के म्हणजेच १ लाख १७ हजार ६३८ रुपये दिले जातील.
तर २ म्हशींसाठी ७५ टक्के म्हणजेच १ लाख ३४ हजार ४४३ रुपये अनुदान दिलं जाते. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम भरावी लागते. जर शेतकऱ्याला कर्ज घ्यायचे असेल, तर सामान्य शेतकऱ्याला उरलेली पूर्ण ५० टक्के रक्कम स्वतः ला द्यायची असते. पण अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना फक्त २५ टक्के रक्कम भरावी लागते.
लाभार्थी निवडताना ३० टक्के महिला आणि ३ टक्के दिव्यांगांना प्राधान्य दिले जाते.
एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ मिळतो.
निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला एक महिन्याच्या आत उर्वरीत हिस्सा भरावा लागतो. त्यानंतर शासन उर्वरित रक्कम अनुदान स्वरूपात देते.
योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला किमान ३ वर्षे दुग्धव्यवसाय करणे बंधनकारक असणार आहे.
जनावरांसाठी योग्य जागा, गोठा, चारा आणि पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
यासह दुग्धव्यवसाय आणि गो/म्हैसपालनाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
जनावरांची खरेदी सरकार मान्यताप्राप्त किंवा पशुसंवर्धन विभागाने अधिकृत केलेल्या केंद्रातूनच करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक.
अनुसूचित जाती, जमाती, महिला, बेरोजगार तरुणांना प्राधान्य.
जनावरांसाठी जागा, गोठा, चारा व पाणी उपलब्ध असणे आवश्यक
आधारकार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
बँक पासबुकची सत्यप्रत
फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
७/१२ सातबारा
८अ उतारा
अपत्य दाखला किंवा स्वयंघोषणा पत्र
रेशनकार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र
७/१२ मध्ये नाव नसल्यास कुटुंब संमतीपत्र किंवा भाडेकरार
अनुसूचित जाती/जमातीचा दाखला
दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र किंवा बँक पासबुकची प्रत
प्रशिक्षण घेतल्यास प्रमाणपत्राची प्रत
अर्ज करण्यासाठी Google Play Store वरून AH-MAHABMS हे अॅप डाउनलोड करा.
तसेच तालुका पशुसंवर्धन कार्यालयातूनही अर्ज मिळतो.
सर्व कागदपत्रांसह अर्ज जमा करा.
अर्जाची तपासणी व निवडीनंतर अनुदान मंजूर केले जाते.
तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय
जिल्हा पशुसंवर्धन उपसंचालक कार्यालय
संकेतस्थळ: https://ahd.maharashtra.gov.in
गाई-म्हशी खरेदीसाठी कोण अनुदान देणार आहे?
राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून गाई-म्हशी खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना आणखी कोणत्या सुविधा मिळतील?
शेतकऱ्यांना जनावरांच्या संगोपनाचे प्रशिक्षण, पशुवैद्यकीय सेवा आणि आर्थिक मदत मिळणार आहे.
या योजनेचा फायदा कोणाला होणार आहे?
पशुपालन व दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होईल.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना काय लाभ होईल?
शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होईल व दुग्धव्यवसाय सुरू करणे सोपे होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.