Bullet Train Project: देशातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? तारीख आली समोर

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचे १२ स्टेशन असणार आहेत. ही ट्रेन ३२० च्या स्पीड धावेल. या ट्रेनबाबत नवी अपडेट समोर आलीय.
Mumbai-Ahmedabad Bullet Trai
saamtv
Published On
Summary
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट २०२७ पर्यंत सुरू होणार.

  • या प्रकल्पासाठी जपानचे तांत्रिक व आर्थिक सहकार्य करत आहे.

  • भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा हा ऐतिहासिक टप्पा

अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला अशून ट्रम्प यांच्या कर आकरणीचा परिणाम भारतीय बाजार कमी व्हावे , यासाठी भारत उपाय योजना आखत आहे. त्याचदरम्यान जपानने भारतासाठी मोठी घोषणा केलीय. जपान पुढील १० वर्षापर्यंत भारतात १०ट्रिलियन येन म्हणजेच ६८ बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. आता बहुप्रतिक्षित अशलेली बुलेट ट्रेनबाबत एक नवीन अपडेट आलीय.

देशातील पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार याची तारीखच समोर आलीय. दरम्यान नरेंद्र मोदी जेल्हा पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते, त्यावेळी त्यांनी बुलेट ट्रेन धावणार असल्याची घोषणा केली होती.आता त्या घोषणेला ११ वर्ष झाली आहेत, पण अद्याप बुलेट ट्रेन सुरू झाली नाहीये. पण आता जपानमधील भारतीय राजदूत सिबी जॉर्ज यांनी मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेन २०२७ पर्यंत धावेल असं सांगितलंय.

Mumbai-Ahmedabad Bullet Trai
FD दर ते LPG गॅस, गोष्टींच्या ५ नियमात होणार बदल; कधीपासून होतील बदल, काय होणार परिणाम?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राजदूत सिबी जॉर्ज म्हणाले, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन २०२७ पर्यंत नक्कीच धावेल. या प्रोजेक्टमध्ये जपानची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कारण ट्रेनमधील हा स्पीड ट्रेनचं तंत्रज्ञान जपानकडून भारताला मिळत आहे. दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर होईल अशा चर्चा मध्यंतरी सुरू होत्या. मात्र आता या चर्चांना भारतीय राजदूत जॉर्ज यांनी पूर्ण विराम दिलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानचा दौरा करणार आहेत. मोदींचा हा दौरा बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान या दौऱ्यावेळी जपान भारतात ५.९६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची शक्यता आहे. पुढे बोलताना जॉर्ज म्हणाले की, चाळीस वर्षापूर्वी जेव्हा भारतात सुझुकी बाईक आली होती, त्यावेळी आपल्या देशातील ऑटोमोबाईल सेक्टरला बदलून टाकलं होतं. आताही इतर क्षेत्रातही तेच होताना दिसतंय. जपान भारताचा आर्थिक भागीदार आहे. २०२२ मध्ये दोन्ही देशातील प्रमुखांनी ५ ट्रिलियन येनची गुंतवणूक करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यातील ४ ट्रिलियन येनची गुंतवणूक आतापर्यंत करण्यात आलीय.

Mumbai-Ahmedabad Bullet Trai
PM SVANidhi Scheme: गणेशोत्सवात आनंदवार्ता! व्यावसायिकांसाठी पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय

जपानमध्ये भारत पाठवणार मनुष्यबळ

२०३० पर्यंत जपानला साधारण ७.९ लाख टेक्नोलॉजी एक्सपर्टची कमतारता भासणार आहे. त्यासाठी भारत आपल्या देशातील तज्ञ लोकांना जपानमध्ये पाठवणार आहे. भारत आणि जपानच्या लोकांमधील आपआपसातील नातं मजूबत आहे.

३२० किमीच्या वेगाने धावणार बुलेट ट्रेन

मुंबई आणि अहमदाबादचा प्रवास २ तास ७ मिनिटात पूर्ण होईल. ही ट्रेन ३२०च्या स्पीडनं धावणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन १२ स्टेनशनवर थांबेल. मुबंई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, आणि साबरमती या स्टेशनवर ही ट्रेन थांबेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com