पैठणची गोदावरी झाली सोन्याची खाण;टोपल्या-चाळण्या घेऊन कुटुंब नदीत, VIDEO

paithan godavari kashi : दक्षिणेची काशी अशी ओळख असलेल्या पैठणमध्ये सध्या वेगळंच चित्र पहायला मिळतंय. गोदावरीच्या नदीपात्रात शेकडो कुटुंब उतरली आहेत. काहीतरी मौल्यवान गवसेल या आशेने टोपल्या-चाळण्या घेऊन दिवसभर नदी पात्रात शोध घेतला जातोय. पाहूया एक खास रिपोर्ट
paithan godavari kashi
godavari news Saam tv
Published On

दक्षिणेची काशी अशी ओळख असलेल्या पैठणमध्ये गोदावरीच्या नदीपात्रात उतरलेली ही शेकडो कुटुंब पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल.. घमेली, फावडा, चाळण्या घेऊन हे तरुण दिवसभर कशासाठी घाम गाळतायेत ? हे सर्व नदीत नेमकं काय करतायेत? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर हे सगळेजण सोनं, चांदी, नाणी शोधण्यासाठी इथं येतायेत. गोदावरीच्या गाळात आपलं नशीब अजमावण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. हे नेमकं कशामुळे सुरू आहे याचा आमच्या साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं थेट घटनास्थळी जाऊन वेध घेतला.

पैठण हे संत एकनाथ महाराजांचे जन्मस्थान आहे. इथं नाथांची समाधी आहे. 'नाथषष्ठी' यात्रेसाठी येथे हजारो वारकरी एकत्र येतात. नाथषष्ठी उत्सवामुळे गोदावरीचं पाणी कमी करण्यात आलंय. त्यामुळे नदीचं विस्तीर्ण पात्र उघडं पडलंय. दशक्रीया विधीसाठीही अनेकजण पैठणला येत असतात. मृतात्म्यांची राख याच पाण्यात सोडली जाते. या राखेसोबत कधी कधी मृतांच्या देहावरील दागिनेही नदीत विसर्जित केले जातात. त्यामुळे या गाळामध्ये काहीतरी मौल्यवान गवसेल आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मदत होईल अशी आशा या शेकडो कुटुंबांना आहे. आणि त्यामुळेच त्यांची सोनं शोधण्यासाठी झुंबड उडालीय.

अगदी सकाळपासून गोदा पात्रात सोन शोधण्यासाठी गर्दी असते. गाळ चाळून त्यातून सोन्याचे कण किंवा दागिन्यांचे तुकडे मिळतात का याचा कसून शोध घेतला जातो. यातून काहींच्या नशिबी थोडंफार गवसतं.,..तर काहींना रिकाम्या हातानंच परतावं लागतं. एकेकाळी पैठण सातवाहन राजांची राजधानी होती.

paithan godavari kashi
तुम्हाला कधीतरी तळमळीने बोलताना पाहावे; अजितदादांच्या आठवणीत जय पवार यांची भावुक पोस्ट

आता जगप्रसिद्ध पैठणी साड्यांचे केंद्र आणि जायकवाडी धरणासाठी म्हणजेच नाथसागरसाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता हे चित्र पाहून पैठणचा गोदा काठ खोन्याची खाण म्हणून नावारुपाला येतंय की काय अशी मिश्कील चर्चा आता रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com