

जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट
१० वर्षे संचालक राहिलेल्या नेत्यांना निवडणूक लढवता येणार नाही
महाराष्ट्रातील जिल्हा बँक निवडणुकीबाबत न्यायालयाचा निर्णय
गोपीचंद पडळकर यांचा सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील अर्ज अवैध
पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना जिल्हा बँक निवडणुकीत धक्का
पश्चिम महाराष्ट्रातील आमदार- खासदारांसह दिग्गज नेत्यांना मोठा धक्का बसला. केंद्र सरकार आणि आरबीआयच्या नव्या नियमांमुळे जिल्हा बँकांच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. जिल्हा बँकांमध्ये १० वर्षे संचालक असणाऱ्यांना पुढची ५ वर्षे निवडणुकीमध्ये उभं राहता येणार नाही असा हा नियम आहे. या नियमामुळे अनेक दिग्गज नेते, आमदार आणि खासदारांना या निवडणुकीत उभं राहत येणार नाही.
मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार विशाल पाटील, माजी खासदार निवेदिता माने, आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक, भैय्या माने, माजी आमदार राजू आवळे, संतोष पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना कोर्टाच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत सलग १० वर्षे संचालकपद भूषवलेल्या नेत्यांसाठी हा धक्का आहे.
जिल्हा बँकांच्या निवडणुका पुढच्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीकडे सहकार क्षेत्रासह सर्वांचे लक्ष लागले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर, बँकेतील नेतृत्वाबद्दल, नव्या उमेदवारांना मिळणारी संधी आणि विविध राजकीय गटांची रणनीती यांना महत्व प्राप्त झालं आहे. या निवडणुकांमध्ये कोणत्या दिग्गजांना संधी मिळते हे पाहणे महत्वाचे राहिल.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा झटका बसला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील गोपीचंद पडळकर यांचा अर्ज अवैध ठरला. कोल्हापूर खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत पडळकर यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. जत सोसायटी गटातील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर मंगळवारी सुनावणी पार पडली होती. सांगलीमधील बँक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पडळकरांचा अर्ज वैध ठरविल्यानंतर याविरोधात माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना कोर्टाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.