

पुणे पदवीधर- शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार
२३ ऑक्टोबर रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार
पुणे पदवीधर निवडणुकीत स्मिता जाधव विरुद्ध हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात लढत
पुणे शिक्षक निवडणुकीत कौस्तुभ गावडे विरुद्ध जयंत आसगावकर
पुणे विभागातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज संपली. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार निडणूक लढवणार आहेत. पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
भाजपने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप माने यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी अपक्ष निवडणूक झाली तर महायुतीमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून शुक्रवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता या ठिकाणी डॉ. स्मिता जाधव आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्यामध्ये दुहेरी लढत होणार आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी ४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पुणे शिक्षकसाठी ऐनवेळी कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र भाजपच्या शिष्टाईला यश आले आणि मंगेश चिवटे यांनी शुक्रवारी अर्ज मागे घेतला. याशिवाय उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक सचिन सानप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज कायम ठेवला आहे. तसेच महाविकास आघाडीमधून जयंत आसगावकर यांचे तगडे आव्हान या दोघांसमोर असणार आहे. त्यामुळे शिक्षण मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे विरुद्ध जयंत आसगावकर विरुद्ध सचिन सानप अशी तिहेरी लढत होणार आहे.
लक्षवेधी सामना: कौस्तुभ गावडे (भाजप) विरुद्ध जयंत आसगावकर (काँग्रेस).विरुद्ध सचिन सानप (अपक्ष)
अर्ज दाखल केलेले उमेदवार: ४८
अर्ज माघारी घेतलेले उमेदवार: १८
निवडणूक लढवणारे एकूण मतदार: ३०
मतदान केंद्राची संख्या: ३१०
एकूण मतदार: ६२ हजार
लक्षवेधी सामना: डॉ स्मिता जाधव (भाजप) विरुद्ध हर्षदा देशमुख-जाधव (महाविकास आघाडी)
अर्ज दाखल केलेले उमेदवार: ६९
अर्ज माघारी घेतलेले उमेदवार: २२
निवडणूक लढवणारे एकूण मतदार: ४७
मतदान केंद्राची संख्या: ७८१
एकूण मतदार: ३ लाख ८८ हजार १९ मतं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.