पुणे शिक्षक निवडणुकीवरून महायुतीत घमासान; फडणवीस-शिंदेमध्ये कोल्डवॉर, वडेट्टीवारांचा दावा

Pune Teachers Mlc Polls: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत चुरस वाढली आहे. भाजपनंतर शिंदेसेनेनेही स्वतंत्र उमेदवार दिल्याने राजकीय वातावरण तापलंय. विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस-शिंदेंमध्ये कोल्डवॉर असल्याचा दावा केला आहे.
Pune Teachers MLC election Mahayuti internal dispute
Pune Teachers MLC election Mahayuti internal disputesaam tv
Published On: 
Summary
  • पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून महायुतीत वाद

  • पुणे शिक्षक निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेकडून स्वतंत्र उमेदवार

  • फडणवीस शिंदेंमध्ये कोल्डवॉर असल्याचा वडेट्टीवारांचा दावा

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडताहेत. महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपनंतर शिंदेसेनेनंही स्वतंत्र उमेदवार उभा केलाय. तर दुसरीकडे, चर्चासत्र देखील सुरू आहे. मात्र, काँग्रेसच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. त्यामुळे पुण्यात निवडणुकीआधीच महायुतीत कशी चुरस रंगलीये?, पाहूयात या रिपोर्टमधून.

विधान परिषदेच्या पाचही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी उफाळून आलीये. मात्र सर्वाधिक चर्चेची ठरलीय ती पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा. कारण या जागेवरून महायुतीतली फूट उघड झाली. कारण पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपनं कौस्तुभ गावडेंना मैदानात उतरवल्यानंतरही शिंदेसेनेनं आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला.

Pune Teachers MLC election Mahayuti internal dispute
Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसलेंनी दुसऱ्यांदा मारली बाजी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत थेट त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी उमेदवारी जाहीर केली. मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत मंगेश चिवटेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पुण्यात महायुतीत घमासान होण्याची चिन्हे आहेत. पुण्याच्या जागेवर दावा ठोकताना एकनाथ शिंदेंनी निवडणूक होईपर्यंत सस्पेन्स वाढवलाय.

तर मुख्यमंत्र्यांनी अजूनही चर्चेची दारं खुली असल्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे, पुणे शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं महायुतीतील नेत्यांना डिवचलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोल्डवॉर सुरू असल्याचा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय.

Pune Teachers MLC election Mahayuti internal dispute
माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पुणे शिक्षक मतदारसंघात अनेक जण रिंगणात असले तरी शिंदेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे भाजप विरूद्ध शिंदेसेना असं स्वरूप या लढतीला आलंय. मात्र उमेदवार मागे घेण्याची मुदत ९ ऑक्टोबरपर्यंत असल्यामुळे आणखी काय खलबतं होणार? शिंदेसेना माघार घेणार की भाजप? महायुतीत कोण कोणाचा गेम करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com