

अजित पवार गटातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
विक्रम काकडे यांचा राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांना इशारा
राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांमध्ये वाद का वाढला
दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि पक्षाचे विधान परिषदेतील आमदार विक्रम काकडे यांच्यात वादाला तोंड फुटले आहे. उमेश पाटील यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर आमदार विक्रम काकडे यांनी थेट माझ्या नादाला लागू नको म्हणत पक्ष प्रवक्त्याला,असा इशारा दिलाय.
आमदार विक्रम काकडे यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदारकी घेणारा महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही,” असा थेट इशारा देत काकडे यांनी पक्षातीलच काही नेत्यांना कानपिचक्या दिल्या. मावळमध्ये आमदार सुनील शेळक यांच्या वतीने पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात काकडे बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात काकडेंनी थेट इशारा दिलाय.
आपल्याबद्दल आणि आपल्या राजकीय संबंधांबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचा आरोप करताना “हे माझं पहिलं भाषण आहे, यापुढे मी काही सुट्टी देणार नाही,” असा इशाराही त्यांनी उमेश पाटलांना दिला. तसेच मावळच्या राजकारणात आपल्याला कोणताही राजकीय हस्तक्षेप करायचा नसल्याचं सांगतानाच मावळच्या कार्यकर्त्यांसाठी आपली ताकद पणाला लावू, निधी आणू, अशी ग्वाही काकडे यांनी दिली. पवार कुटुंबाशी आपले जुने आणि कौटुंबिक संबंध असल्याचा उल्लेख करत त्यांनी पक्षांतर्गत कानभरणी करणाऱ्यांना थेट लक्ष्य केलं. उमेश पाटील यांनी मी पैशांच्या जीवावर आमदार झाल्याचे विधान केलं होतं .पण, पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा अद्याप जन्माला यायचा आहे, असे विक्रम काकडे म्हणाले.
काय म्हणाल्या महिला अध्यक्षा?
आज स्टेजवर बसलेल्या माझ्या सगळ्या महिला अध्यक्ष असतील पंचायत समितीच्या सभापती महिला असेल किंवा पुरुष असो परंतु आपण तिकीट मागायला जाताना वीस पंचवीस गाड्या नाही शंभर गाड्या घेऊन जातो, पण पक्षाचा मेळावा असताना आपण एका दुसऱ्या पाठवत नाहीत चला आता पक्षाचा मेळावा आहे आणि ही खंत फक्त तुमची नाही पण निवडून आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आता माझं झालंय माझं भागलंय. पण निवडून आल्यानंतर आपला भागलेला असतं पण खऱ्या अर्थानं या लोकांना जर आपल्याला बर द्यायचं असेल आणि पुढची कारकीर्द आणखी मोठी करायची असेल तर संघटनेला बरोबर घेऊन जाणं हे लोकप्रतिनिधीचा काम असतं, वैशाली नागवडे यावेळी म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.