पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत फूट; भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी आमनेसामने, कोणी-कोणी भरला अर्ज?

Pune MLC Elections : पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने लढतीची रंगत वाढली आहे.
Pune MLC Elections
Mahayuti split in Pune Teachers Constituency election 2026saam tv
Published On: 
Summary
  • महाराष्ट्र विधान परिषद पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट

  • पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विरुद्ध मंगेश चिवटे

  • पुणे शिक्षक मतदारसंघात बब्रुवाहन रोंगे यांचा अपक्ष अर्ज

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीत फुट पडलीय. शिंदेसेना,राष्ट्रवादी,भाजपमध्ये लढत होणार आहे. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली त्यावेळी महायुतीच्या नेत्याकडून आपण महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं म्हणत होते. स्थानिक पातळीवरील परिस्थीत मात्र वेगळीच होती.

शिक्षक मतदारसंघ असो की पदवीधर मतदारसंघ दोन्ही निवडणुकीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले. आज बब्रुवाहन रोंगे, मंगेश चिवटे, तर पदवीधर मतदारसंघातून बब्रुवाहन रोंगे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय.

भाजपनं पुणे शिक्षकसाठी कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी दिलेली तर शिंदेसेनेनं मंगेश चिवटेंना पक्षाचा एबी फॉर्म दिल्यानं महायुतीत उभी फुट पडली. तर भाजपच्या बब्रुवाहन रोंगे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आबीटक उपस्थित होते. हीच स्थिती पदवीधर मतदारसंघाची स्थिती आहे.

Pune MLC Elections
Shiv Sena Case live: शिंदे की ठाकरे, शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचे? सुप्रीम कोर्टात काय घडलं? वाचा A टू Z अपडेट

१५० वाहनांचा ताफा घेऊन केलं शक्ती प्रदर्शन

पंढरपूर मधील स्वेरीज शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे बब्रुवाहन रोंगे यांनी पंढरपूर ते पुणे कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येत उमेदवारी अर्ज केला दाखल. रोंगे यांना शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. कार्यकर्त्यांसमवेत शक्ती प्रदर्शन करत त्यांनी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Pune MLC Elections
उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना महायुती व महाविकास आघाडी कडून काही उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. तर काही शिक्षण संस्था तसेच शिक्षकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ,असं असताना या सगळ्यांमध्ये पंढरपूर येथील प्राचार्य डॉ बब्रुवाहन रोंगे यांनी पंढरपूर ते पुणे असं तब्बल १५० वाहनांच्या ताफासह शक्ती प्रदर्शन करत आपलं उमेदवारी अर्ज भरला आहे.

शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा, असा नारा देत मंत्री उदय सामंतांचे OSD सचिन सानप यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजपनं ऐनवेळी स्मिता जाधव यांना पुणे पदवीधरसाठी उमेदवारी दिल्यानं भाजपचे नाराज इच्छुक उमेदवार शरद लाड यांनीही बंडखोरी करत अर्ज दाखल केला. तर मंत्री मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आणि दादांच्या राष्ट्रवादीचे प्रताप माने यानीही बंडखोरी केली आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीत बंडखोरी; भैय्या माने यांचा अपक्ष अर्ज

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत नाराजी आता उघड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) निष्ठावंत कार्यकर्ते, शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. “काहीही झाले तरी मी १०० टक्के निवडणूक लढणार असून माघार घेणार नाही,” असा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

माने यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करताना, गेल्या निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला माघार घेण्याची विनंती केली होती आणि पुढील वेळी संधी देण्याचा शब्द दिला होता, असा दावा केला. मात्र, यंदा उमेदवारी मिळाली नसल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com