

शिवसेना आणि भाजपामधील राजकीय वाद चांगलाच पेटला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप
भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वाधारिया यांनी कमलेश निकम यांच्यावर कारवाईची मागणी केली
अजय दुधाणे, साम प्रतिनिधी
उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपामधील राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. महापौरांचे पती कमलेश निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वाधारिया यांनी केली आहे. दरम्यान, कमलेश निकम यांच्यावर कारवाई न झाल्यास येत्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचा इशारा भाजपा आमदार कुमार आयलानी यांनी दिला.
दुसरीकडे, भाजपाचे प्रदीप रामचंदानी, कपिल अडसूळ, मनीष हिंगोराणी आणि अवि पंजाबी हे आपल्या हत्येचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप कमलेश निकम यांनी केला आहे. संबंधितांना अटक करावी तसेच प्रदीप रामचंदानी यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे, अशी मागणी त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे केल्याचे सांगितले.
उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपामधील राजकीय संघर्ष आता आरोप-प्रत्यारोपांपलीकडे जाऊन पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस काय भूमिका घेतात आणि आरोपांची चौकशी कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आज झालेल्या महापालिकेतील बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे महापौर अश्विनी निकम यांचे पती आणि शिवसेना पदाधिकारी कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं,त्या विरोधात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वाद निर्माण झालेत,उल्हासनगर महापालिकेत यामुळे प्रचंड तणाव निर्माण झालाय,यावेळी भाजपा सभापतीच्या दालनासमोर शिवीगाळ करत शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली,भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून माझी हत्या केली जाईल, असा आरोप निकम यांनी केला आहे.
उल्हासनगर महापालिकेतील सत्तासमीकरणावरून भाजप आणि शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत. नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून भाजपने शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. उल्हासनगर महापालिकेत यापुढे युतीमधून बाहेर पडण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आलीय.
तसेच आगामी कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करण्याची भूमिका भाजपने जाहीर केलीय.स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत शिवसेनेकडून खेळी करण्यात आल्याचा आरोप भाजपने केलाय. याच मुद्द्यावर आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली होती. आता या वादाचा दुसरा पडाव सुरू झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.