शासकीय वसतिगृहात जेवणात अळ्या, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ

Worms Found In Government Hostel Food: जालना आणि हिंगोलीतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहातील जेवणात अळ्या व किडे आढळल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे.
Officials inspect the government hostel after maggots were found in food served to students, triggering protests and outrage.
Officials inspect the government hostel after maggots were found in food served to students, triggering protests and outrage.Saam Tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालन्यातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या जेवणात अळ्या आढळल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे वसतिगृहातील मुलींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Officials inspect the government hostel after maggots were found in food served to students, triggering protests and outrage.
Badlapur : बदलापूरमध्ये ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा; पुढील १० दिवस सुरु राहणार कारवाई

महत्त्वाचं म्हणजे, याआधीही या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं आणि अपुऱ्या प्रमाणात जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. मात्र या तक्रारींकडे संबंधित प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

Officials inspect the government hostel after maggots were found in food served to students, triggering protests and outrage.
मुलासमोरच बापाची नशेखोरांनी केली हत्या, संतप्त ग्रामस्थांचा पोलिस मुख्यालयावर मोर्चा

शहरातील मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी असलेल्या या शासकीय वसतिगृहात स्वच्छतेचा पूर्णतः अभाव असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं आहे. वेळेवर जेवण मिळत नसल्यासह अन्नाच्या दर्जाबाबतही कायम तक्रारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकारामुळे थेट मुलींच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.

Officials inspect the government hostel after maggots were found in food served to students, triggering protests and outrage.
Solapur Mayor Election : शिंदेंच्या शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा, सोलापूरच्या युतीची राज्यात चर्चा

दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत समाज कल्याण विभागाच्या निरीक्षकांनी वसतिगृहाची पाहणी केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येणार असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र केवळ कारवाईचे आश्वासन न देता, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

Officials inspect the government hostel after maggots were found in food served to students, triggering protests and outrage.
शिंदेगटातून बड्या नेत्याची हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

तसेच हिंगोलीच्या कळमनुरी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनात अळ्या आणि किडे आढळल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने हे वसतिगृह कळमनुरी शहरांमध्ये सुरू आहे आणि इथे अनेक विद्यार्थी निवासी राहतात विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने व्यवस्था करण्यात येते मात्र याच भोजनामध्ये आज सकाळी जेवण्याच्या ताटामध्ये विद्यार्थ्यांना अळ्या आणि किडे आढळल्याने सामाजिक न्याय विभागाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या वस्तीगृहाकडे धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते तर अळ्या आणि किडे आढळलेले जेवण तुम्ही खा असा आग्रह संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धरला होता, या प्रकारानंतर सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांनी तातडीने वस्तीगृहातील दोषींवर कार्यवाही सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com