ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय किचनमध्ये अनेक लोखंडी कढईत भाज्या बनवतात. लोखंडी कढईत बनवल्या जाणाऱ्या भाज्यांचा स्वाद काही वेगळाच असतो.
काही घरांमध्ये महिला या लोखंडी कढईत जेवणसुध्दा जेवतात. यात भात, भाजी आणि डाळ टाकून खाले जाते.
लोखंडी कढईत जेवण जेवणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
लोखंडी कढईमध्ये जेवण बनवणे आणि जेवण जेवल्याने शरिरातील आयरनची कमतरता भरुन काढली जाते. ज्या लोकांमध्ये आयरनची कमतरता असते अशा लोकांनी लोखंडी कढईत जेवण केले पाहिजे.
नॉन-स्टिक, स्टील किंवा फायबरच्या भांड्यांमध्ये अन्न खाल्ल्याने शरीरात केमिकल प्रवेश करू शकते. तसेच, लोखंडी कढईत अन्न खाल्ल्याने, तुम्ही पौष्टिक अन्नाचा आस्वाद घेऊ शकता.
लोखंडी कढईत शिजवलेले अन्न खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारते. लोह पोट निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत करते. यामुळे पचनसंस्था मजबूत होईल.
लोखंडी भांड्यात अन्न खाल्ल्याने चव चांगली लागते, ज्यामुळे तुमची भूक वाढेल. तुम्हाला जास्त खाण्याची इच्छा होईल आणि कमी वजनाच्या लोकांचे वजन वाढण्यास मदत होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.