ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गरमी असो किंवा थंडी प्रत्येक सीझनमध्ये घरात लाईट बील हे जास्तच येत. यामुळे लोकांच्या बजेटवर यांचा परिणाम होताना दिसतो.
जर तुमच्या घरातसुध्दा लाईट बील जास्त येत असेल तर काही ट्रिक्स वापरून तुम्ही लाईट बील कमी करु शकता. जाणून घ्या.
पिवळे बल्ब जास्त लाईट खेचून घेतात म्हणून सर्वात आधी घरात एलईडी बल्ब लावा.
गीझर, फॅन , लाईट, वॉशिंग मशिन यांसारख्या इलेक्ट्रिकल डिव्हाईसची गरज असेल तेव्हा वापर करावा.
घरातील फ्रिज आणि एसी दिवसामध्ये थोडावेळ तरी बंद करावा. बंद केल्यास कोणतेही नुकसान होणार नाही आणि लाईटची सुध्दा बचत होईल.
काही लोक दिवसासुध्दा घरातील लाईट चालू ठेवतात. असे न करता घरातील खिडक्या उघडाव्या जेणेकरुन उजेड घरात येईल आणि लाईटची बचत होईल.
हे सगळ करुनसुध्दा लाईट बिल जास्त येत असेल तर घरावर सोलर लावून घेणे. लाईट बिल कमी करायचे असेल तर लोक सोलरचा ऑप्शन निवडतात.
तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटी मीटरवरील रीडिंग चेक करा. चेक केल्यास तुम्हाला लक्षात येईल किती लाईट खर्च होते.