ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हे एक पेपर कॉटन किंवा पेपर शीट सारखे असते त्यावर सीरम लावलेले असते.
हे मास्क स्किन टाईप प्रमाणे मिळतात. पिंपल्स फ्री, डिप हायड्रेशन, स्किन इल्युमिनेशन, व्हिटॅमिन सी आणि ग्लोइंग स्किन हे टाईप प्रामुख्याने मिळतात.
शीट मास्क त्वचेला खोलवर हायड्रेट करते ज्याने त्वचा सॉफ्ट आणि चमकदार बनते.
शीट मास्कमधील सीरम त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करते आणि त्वचेला चमक देखील आणते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करते.
शीट मास्कचा उपयोग त्वचेसोबत मनसुध्दा शांत करण्यास मदत होते.
नेहमी स्वच्छ चेहऱ्यावर शीट मास्क लावावा. तो १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर काढून टाका. काढल्यानंतर सीरमने मसाज करा.
शीट मास्क वापरणे खूप सोईचे असते. हा मास्क तुम्ही प्रवास करतानासुध्दा चेहऱ्यावर लावू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.