ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सगळ्यात आधी चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि सॉफ्ट टॉवेलने चेहरा पुसून घ्या.
कच्या दुधात मध मिक्स करुन चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
ओट्स, दूध आणि नारळ तेलाचे २ ते ४ थेंब मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावून स्क्रब करा.
त्वचेसाठी स्टिम घेणे चांगले असते. यामुळे स्किनवरील पोर्स उघडले जाऊन त्यातील घाण बाहेर निघण्यास मदत होते.
केळ, मध आणि मलई यांचे मिश्रण तयार करुन फेस पॅक तयार करा आणि १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा.
पाण्याने चेहरा साफ करुन स्किन मॉइश्चराइज करा. १५ ते २० दिवसामध्ये एकदा हे फेशियल तुम्ही करु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.