Solapur Mayor Election : शिंदेंच्या शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा, सोलापूरच्या युतीची राज्यात चर्चा

Solapur municipal corporation mayor election updates : सोलापूर महानगरपालिकेतील महापौर निवडणूक अटीतटीची ठरणार असून काँग्रेसने शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजप, शिंदे शिवसेना आणि एमआयएममध्ये ६ फेब्रुवारी रोजी तिरंगी लढत होणार आहे.
eknath shinde news
eknath shinde Saam tv
Published On

Congress support to Shinde Sena in Solapur mayor election : सोलापर महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणूक अतिशय अटीतटीची होत असल्याचे चित्र आहे. महापौरपदासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि एमआयएम निवडणुकीच्या रिंगणात उतरलेय. सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ६ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवड होणार आहे. सोलापूरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या या नव्या युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत सोलापूर काँग्रेसने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. सोलापूरमध्ये एमआयएमकडून तौफिक हत्तुरे यांनी महापौर, तर आसिफ शेख उपमहापौरपदासाठी अर्ज भरलाय. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रियदर्शन साठे मैदानात उतरले आहेत. भाजपकडून विनायक कोंड्याल आणि ज्ञानेश्वरी देवकर यांनी अर्ज भरलाय. (Maharashtra mayor elections updates)

शिंदेंच्या शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा -

सोलापूर महानगरपालिका महापौर निवडणुकीमध्ये नवीन युती झाली आहे. काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. महापौर आणि उपमहापौर पदासाठी काँग्रेस आणि शिंदे सेना एकत्र आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक प्रियदर्शन साठे यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. सहा फेब्रुवारी रोजी चमत्कार घडण्याचं शिवसेना गटनेते अमोल शिंदे यांनी दावा केला आहे.

eknath shinde news
Accident : कारची दुचाकीला जोरात धडक, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जागेवरच मृत्यू, शिवसेनेवर शोककळा

सोलापूर महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची युती असल्याचं काँग्रेस गटनेते चेतन नरोटे यांनी जाहीर केले आहे. सोलापूर महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचे चार तर काँग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आलं आहेत. भाजप, शिवसेना पक्षासह MIM पक्ष नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेतील महापौर आणि महापौर पदासाठी सहा तारखेला तिरंगी लढत होणार आहे.

eknath shinde news
TDP workers : मुख्यमंत्र्यांबद्दलचं ते विधान भोवलं, माजी मंत्र्यांच्या घरावर हल्ला, तोडफोडीनंतर जमावाने लावली आग

भाजपकडून कुणाच्या नावाची चर्चा ?

सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आम्ही अर्ज भरल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली. व्हीप बाजावून देखील दोन नगरसेवक बैठकीला गैरहजर होते, गैरहजर नगरसेवकांचा अहवाल प्रदेशाला कळवला जाईल, असे रोहिणी तडवळकर यांनी सांगितले.

eknath shinde news
TDP workers : मुख्यमंत्र्यांबद्दलचं ते विधान भोवलं, माजी मंत्र्यांच्या घरावर हल्ला, तोडफोडीनंतर जमावाने लावली आग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com