Accident : कारची दुचाकीला जोरात धडक, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जागेवरच मृत्यू, शिवसेनेवर शोककळा

Shiv Sena leader Chandrakant Ingle dies in Beed road accident : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात महामार्गावर कार आणि दुचाकीच्या धडकेत शिवसेना नेते चंद्रकांत शहाजी इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला.
eknath shinde on ladki bahin yojana
eknath shindeSaam tv
Published On

Beed Shiv Sena Leader Death : अहिल्यानगर महामार्गावर कार आणि दुचाकीच्या धडकेत शिवसेना नेत्याचा जागेवरच मृत्यू झाला. चंद्रकांत शहाजी इंगळे (५०) असे मृत शिवसेना नेत्याचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी बीड जिल्ह्यात केजमधील ढाकेफळ परिसरात झालेल्या अपघातात स्थानिक शिवसेना नेते चंद्रकांत शहाजी इंगळे यांचे निधन झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंगळे हे एका धार्मिक कार्यक्रमानंतर दुचाकीने घराकडे निघाले होते. त्याचवेळी ढाकेफळमध्ये काळाने घाला घातला. एका कारने इंगळेंच्या दुचाकीला जोरात धडक दिली. भीषण अपघात त्यांच जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर बीडमधील शिवसैनिकांवर शोककळा पसरली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनस्थळावर धाव घेतली. पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. अपघातस्थळावर पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

eknath shinde on ladki bahin yojana
TDP workers : मुख्यमंत्र्यांबद्दलचं ते विधान भोवलं, माजी मंत्र्यांच्या घरावर हल्ला, तोडफोडीनंतर जमावाने लावली आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत इंगळे हे एका धार्मिक कार्यक्रमातून दुचाकीवरून घरी परत येत होते. त्यावेळी अचानक मागून एका कारने दुचाकीला जोरात धडक दिली. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला अपघाताची माहिती दिली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. इंगळे यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पंचनामा केला अन् मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

eknath shinde on ladki bahin yojana
मुंबईत हाय अलर्ट! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, तस्करीची भीती वाढली

चंद्रकांत इंगळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कैजमधील युनिटचे उपाध्यक्ष होते. इंगळे हे परिसरातील शिवसेनेचे सक्रीय नेते म्हणून ओळखले जात होते. आजूबाजूच्या ठिकाणाच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वारंवार उपस्थित राहत होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये शोककळा पसरली. इंगळे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक आणि समर्थक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचल्याने घरात शोकाचे वातावरण पसरले आहे.

eknath shinde on ladki bahin yojana
Praful Patel : प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती, भाजपच्या पियुष गोयल यांची घोषणा, राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com